प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
तेल्हारा येथून जवळच असलेल्या नेर येथील अग्नीविर आत्ताच आपले खडतर ट्रेनिंग पुर्ण करून आपल्या गावी नेर ला अवकाश वर आलेला असता गावातील नागरीकांनी त्यांचा नागरी सत्कार करून गौरवण्यात आले गावातील पुरुष व महिला नागरीक या वेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली कॅप्टन डोबाळे यांनी देशसेवा करायची धमक ही सैन्यामध्ये राहूनच मातृभूमिचे ऋण फेडण्यासाठी केली जाते असे प्रतिपादन आपल्या भाषनात केले .
अग्नीविर गणेश भिकाजी पारधी यांना जन्म देणारे त्यांचे आई वडील यांचा ही सपत्नीक सत्कार यावेळेस सर्वप्रथम करण्यात आला .पुर्विच्या काळात सैन्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील च जास्तीत जास्त सैनिक व अधिकारी असायचे व विदर्भातील संख्या मात्र नगण्य असायची अशी खंत ही कॅप्टन डोबाळे यांनी व्यक्त केली कार्यक्रमात प्रामुख्याने अग्नीविर गणेश यांना प्रशिक्षण देणारे कानशिवणी येथिल कॅप्टन सुभाष निर्मळे अकॅडमीचे संचालक कॅप्टन सुभाष निर्मळे हेही उपस्थित होते .आपल्या क्षेत्रातील मुलांनी जास्तीत जास्त सैन्यामध्ये जावे याकरीता कॅप्टन निर्मळे यांनी गोर गरीब मुलांना पारिस्थिती नसेल तर बिना फि चे ही प्रशिक्षित करू असे सुनिल डोबाळे यांच्या सुचनेला स्विकृत करून कॅप्टन निर्मळे यांनी जाहीर केले कार्यक्रमाला गावातील गणमान्य मान्यवर श्री गोविंदा सपकाळ श्री अविनाश वानखडे श्री नितीन पाटील गजानन नागोराव पारधी प्रकाश कापसे देवेंद्र पारधी
बाळकृष्ण पारधी राजेश पारधी गोपाल पारधी रवी खडसने ( मामा )बंडू चौके प्रमोद पारधी उल्लास पारधी
अक्षय मोहोड अक्षय पारधी हे उपस्थित होते .शेवटी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोहोड यांनी तर आभार प्रदर्शन श्री मंगेश मोहोड यांनी केले .
0 Comments