Advertisement

जळगाव जामोद बस स्टँड परिसरात चीडीमारी व बेशिस्त वर्तन करणाऱ्यावर कारवाईची गरज

जळगाव जामोद बस स्टँड परिसरात  चीडीमारी व बेशिस्त वर्तन करणाऱ्यावर कारवाईची गरज
 जळगांव जा.प्रतिनिधी:-
सध्या उन्हाळ्याची सुट्टी संपली असून शाळा महाविद्यालये काही दिसातच सुरू होणार आहेत, परंतु काही शालेय विद्यार्थ्यांचे ट्युशन क्लासेस सुरू झालेले आहेत ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी  जळगाव शहरात येत असतात यामध्ये विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ट्युशनला जाण्या येण्याच्या वेळेस बस स्टँड परिसरात चीडीमारी करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत आहेत.अनेक रिकामटेकडे बस स्थानक परिसरामध्ये जोराने गाडी फिरवणे, हॉर्न वाजवणे मुलीला पाहून टवाळगिरी करणे असे कृत्य करताना आढळतात. अशा रिकामटेकड्या रोड रोमिओवर वेळीच जर बंधन घातले नाही तर एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण शाळकरी मुलींना तालुक्यामध्ये फुस लावून पळून नेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा रोड रोमिओवर बंधन घालण्यासाठी बस स्थानकामध्ये दामिनी पथकाची नियुक्ती करणे जरुरी आहे तसेच बस स्टॅन्ड ते महाविद्यालय या मार्गावर महाविद्यालय चालू होणे व बंद होणे या वेळात पोलिसांकडून पेट्रोलिंग आवश्यक आहे परंतु बस स्टँड परिसरात असा पोलीस विभागाकडून कोणताही बंदोबस्त अद्यापही आढळून आला नाही. येणाऱ्या काही दिसातच शाळा कॉलेज चालू होणार असल्याने या चिडीमारी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ शकते त्या अगोदरच पोलीस विभागाने अशा रिकामटेकड्या रोड रोमियो चा बंदोबस्त करावा तसेच बस स्टॅन्ड परिसरात रिकामटेकडी मुले गाडी घेऊन  येतात व विनाकारण मुलींना पाहुन हॉर्न वाजवतात अशावर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच जळगाव जामोद शहरातील काही लॉज मालक अश्लील चाळेकरण्याकरिता लॉज उपलब्ध करून देत आहे व त्यांच्याकडून हजारो रुपये उकडत आहेत. तसेच हे लॉजमालक १८ वर्षे खालील मुला मुलींनाही लॉजवर प्रवेश देत आहेत. असे लॉज शोधून त्या लॉज मालकावर कारवाई करण्याची सुद्धा मागणी पालकांसह नागरिक करीत आहे.

Post a Comment

0 Comments