Advertisement

सुनगांव ग्रामपंचायत कार्यालयात फेकला चिखलवार्ड नंबर एक मधील नागरिकांचा आंदोलनचा ईशारा

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड नंबर एक मध्ये ग्रामपंचायतने पावसाळा अगोदर सफाई कामगार असताना सुद्धा नागरिकांनी सरपंच यांना वेळोवेळी सांगून सुद्धा नाल्या साफसफाई केलेल्या नाही त्यामुळे काल 15 जून रोजी झालेल्या पावसामुळे नाल्या ह्या केरकचऱ्याने तुडुंब भरून ब्लॉक झाल्या व परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी घुसले त्यामुळे नागरिकांच्या घरातील खाण्यापिण्याच्या वस्तू भिजल्या सरपंच व सचिव यांना वेळोवेळी सांगून सुद्धा व लेखी अर्ज देऊन सुद्धा कोणत्याच प्रकारची नालिसफाई व दुरुस्ती या वार्ड नंबर एक मध्ये केलेली नाही या वार्ड नंबर एक मध्ये फार दयनीय अवस्था झालेली आहे ठिकठिकाणी पावसाळ्यात सुद्धा कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत परिणामी पावसाचे पाणी घरात शिरल्यामुळे गुडघाभर पाणी घरात झाले त्यामुळे नागरिकांनी संतापून एकत्र येऊन वार्ड नंबर एक मधून ग्रामपंचायत कार्यालयावर डफळे बजाव मोर्चा काढून या मोर्चामध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये चिखल फेकण्यात आला यावेळी संजय निमकर्डे मंगेश गवइ सोमनाथ गवइ व महिला उपस्थित होत्या तरी या बाबतीत ग्रामपंचायतला निवेदन देनार असल्याचे या नागरिकांनी म्हटले आहे व परिणामी दुरुस्ती व नाल्या साफसफाई न झाल्यास ग्रामपंचायतला नागरिकांच्या आक्रोशाला सामोरे जावेलागणार असल्याचे येथील नागरिकांनी म्हटले आहे व व होणाऱ्या परिणामास स्वतः ग्रामपंचायत जबाबदार राहणार आहे

Post a Comment

0 Comments