*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जाचक अटी कमी करून आधार लिंक द्वारे सरसकट लाभ देणे बाबत जिल्हाधिकाऱ्यांना सर्व पक्षीय निवेदन*
जळगाव जामोद प्रतिनिधी
आज दिनांक 2 जुलै 2024 रोजी जळगाव जामोद तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, प्रहार जनशक्ती पक्ष .वंचित बहुजन आघाडी यांनी संयुक्तपणे जिल्हाधिकारी बुलढाणा यांना महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्याचक अटी कमी करून आधार लिंक द्वारे सरसकट लाभ देण्याबाबत निवेदन दिले. सदर निवेदनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक ज्याच्याक अटी लावण्यात आले असून यामुळे गाव खेड्यातील समस्त महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे मुद्रांक विक्रेत्यांसमोर एक एक किलोमीटर लांब रांगा दिसत आहेत वास्तविक प्रगत तंत्रज्ञानामुळे आधार लिंक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देणे सहज शक्य आहे असे नमूद आहे.
तरी आधार कार्ड व बँक पासबुक या दोनच कागदपत्राच्या आधारे सदर लाभ सरसकट थेट खात्यात देण्यात यावा तसेच ऑनलाइन पोर्टल सुरू होईपर्यंत ग्रामपंचायत पातळीवर ऑफलाईन अर्ज स्वीकारून तात्काळ सरसकट याद्या प्रसिद्ध करून लाभार्थ्यांच्या खात्यात थेट लाभ जमा करावा अन्यथा लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे
यावेळी बोलताना माननीय तहसीलदार यांनी सदर योजनेतील अधिवास प्रमाणपत्राला पर्याय म्हणून जन्माचा दाखला / शाळेची टीसी तसेच शंभर रुपयांच्या स्टॅम्प एवजी वीस रुपयाचे तिकीट लावून स्वयंघोषणापत्र देण्याबाबत परिपत्रक काढण्याचे आश्वासन दिले, तसेच परिपत्रकानुसार कागदपत्रांमध्ये झालेला बदल बाबत निश्चित माहिती मिळेपर्यंत लाभार्थ्यांनी घाई न करता शांतता बाळगावी अशी विनंती तहसीलदार यांनी केली.
यावेळी अविनाश उमरकर, तालुका अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, संतोष गवई तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, प्रमोद सपकाळ तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, भीमराव पाटील विधानसभा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राजेश लहासे उपजिल्हाप्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष, समाधान दामधर, तुकाराम काळपांडे, रमेश ताडे, एम आसिफ इक्बाल, एडवोकेट भालेराव, महादेवराव इंगळे, रमेश नाईक, अनंता झाल्टे, विश्वासराव भालेराव, सुहास वाघ, पराग अवचार, दत्ता दिवरे, सुभाष शिरसागर कॉमा गुलाबरावजी इंगळे, अजहर देशमुख, प्रमोद कोकाटे, मधुकर जाधव, मिलिंद वानखडे, विजय तायडे, व सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments