Advertisement

जळगाव जामोद शहरात लाडक्या बहिणींची तुफान गर्दी...

जळगाव जामोद शहरात लाडक्या बहिणींची तुफान गर्दी...
जळगाव जामोद प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने नुकताच पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर एक जुलै पासून सदर योजनेचा अर्ज भरायला सुरुवात झाली आहे एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार असून महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सदर योजनेचा लाभ मिळवण्याकरता उत्पन्नाचे दाखले रहिवासी दाखला जन्म प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे मिळवण्याकरिता लाडक्या बहिणीची म्हणजेच महिलांची धावपळ सुरू झालेली आहे तलाठी कार्यालय तहसील कार्यालय त्याचबरोबर शाळेचे दाखले काढण्याकरता माहेरी जाण्यासाठी महिलांची लगबग आढळून येत आहे . तलाठी कार्यालयामध्ये पुरुष वर्गाची मोठी गर्दी बघायला मिळत असते अगदी कागदपत्रे काढण्यासाठी सुद्धा पुरुष पुढे असतात परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आपल्याला मिळावा म्हणून लाडक्या बहीनिंनी मोठ्या प्रमाणामध्ये स्टॅम्प पेपर, तलाठी कार्यालय, ई सेवा केंद्र यांच्या बाहेर रांगाच्या रांगा लाऊन लाडक्या बहिणींची तुफान गर्दी जळगाव जामोद शहरात बघायला मिळत आहे शहरात झालेल्या महिलांच्या गर्दीमुळे विद्यार्थ्यांना कागदपत्र मिळवण्याकरता अडचणी निर्माण होत आहेत.उपाशीपोटी जास्त वेळ रांगेत उभे राहून एखादी लाडकी बहीण चक्कर ऐऊन पडली तर यास जबाबदार कोण अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.सध्या तरी लाडक्या बहिणीचे कागदपत्रे जमा करण्यासाठी धावपळ बघायला मिळत असून अधिवास प्रमाणपत्राची अट कशासाठी हा सुद्धा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे.अनेक  महिलांना शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माची नोंद सापडत नसल्यामुळे सरपंच किंवा सचिव रहिवासीचा दाखला घ्यावा असे सुद्धा मत काही महिलांनी व्यक्त  आहे

Post a Comment

0 Comments