Advertisement

उद्यानविद्या महाविद्यालयातील कृषीकन्यांनी वडशिंगी येथे राबविले गुरांचे आरोग्य तपासणी व लसीकरण शिबिर जळगाव जामोद:- प्रतिनिधि

उद्यानविद्या महाविद्यालयातील कृषीकन्यांनी वडशिंगी येथे राबविले गुरांचे आरोग्य तपासणी व लसीकरण शिबिर

 जळगाव जामोद:- प्रतिनिधि 

   पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ मडाखेड, कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद व स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लसीकरण वंध्यत्व निवारण व जंत निर्मुलन शिबिर दि.१९ जुलै रोजी ग्राम वडशिंगी येथे घेण्यात आले.
      सदर शिबिरात शेतकऱ्यांना घटसर्प एकटांग्या रोगाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.तसेच गावातील पशुंना जंत निर्मुलन वंधत्व निवारण तपासणी, गर्भ तपासणी व लसीकरण करण्यात आले. यावेळेस डॉ.ईसड सहा.उपयुक्त तालुका लघुसर्वपशु चिकित्सालय जळगाव जामोद ,डॉ विनोद जानोतकर विषय विशेषज्ञ पशु संवर्धन कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद , डॉ धनंजय मोरे पशुधन पर्यवेक्षक पशुवैद्यकीय दवाखाना मडाखेड यांनी मार्गदर्शन केले.
सदर आरोग्य शिबिर उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी प्रतिक्षा टाकळकार,अश्विनी तायडे, गौरी बावस्कार, कोमल भोपळे, भाग्यश्री नागोलकार, श्रुती उगले, प्रतिक्षा दिवणाले व अंजली दाभाडे यांनी गावचे सरपंच यांच्या मदतीने आयोजित केले.
सदर शिबीराच्या यशस्वीतेसाठी अमोल फाळके,राजदिप गायकवाड, श्रीकांत जाधव,श्री खुपासे,अबुजर शेख पशुसेवक यांनी सहभाग घेतला.यावेळेस कार्यक्रमादरम्यान गावचे सरपंच , उपसरपंच,ग्रामसेवक , ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी  उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.विशाल तायडे सर, कार्यक्रम अधिकारी प्रा.मुखतार खान सर , विषयतज्ञ प्रा.जिव्हेश साळी सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.  .

Post a Comment

0 Comments