जळगांव जामोद:-महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी लेक माझी लाडकी योजना सुरू केली आहे यामध्ये वयोमर्यादा२१ते६० वर्ष आहे आणि या योजनेच्या पात्र महिलांना जन्माचे प्रमाणपत्र आवश्यक आहे परंतु ग्रामपंचायत येथिल जन्मनोंद रजिस्टर हे पंचायत समिती मध्ये जमा असल्याने महिलांना खेडेगावातुन तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी आर्थिक भुर्दंड पडतो व वेळ सुद्धा वाया जातो आणि त्यातच पंचायत समिती मध्ये जन्म मृत्यू विभागात एकच कर्मचारी आहे त्यामुळे महिलांना खुप त्रास होत आहे त्याकरिता पंचायत समितीमधील जन्म नोंदणी रजिस्टर हे त्या त्या ग्रामपंचायतीला देण्यात यावे किंवा पंचायत समिती मध्ये स्पेशल कक्ष सुरू करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चे तालुका उपाध्यक्ष सुनिलभाऊ बोदडे यांनी गटविकास अधिकारी यांना अर्जाद्वारे केली आहे.यामुळे महिलांना खुप आधार होऊन होणारा त्रासही कमी होईल असे निवेदनात म्हटले आहे
0 Comments