जळगाव जामोद शहरातील काही मागण्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षा चे जिल्हा उपाध्यक्ष शेख जावेद यांच्या नेतृत्वात नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले,त्यामध्ये खालील मागण्या नमुद केलेल्या आहे 1)सुलतानपुरा चरखे लेआऊट ओपन स्पेस मध्ये येथील शादी खाण्याचे टेंडर झाले असून लवकरात लवकर बांधकाम सुरू करण्यात यावे तसेच 2)सुलतानपुरा अहेमद साहेब यांच्या दुकानापासून ते राजांभरतुरीनाथ मंदिर पर्यंत मंदिर पासून ते गोटेचा सर यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रेटिकरन करणे 3) प्रभाग क्र.4 व 5 मध्ये सईद भाई किराणा पासून ते सुनील चिंचोलकर तसेच चिंचोलकर ते वायलीवेस चावडी कमान पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे 4)प्रभाग क्र.4 राजांभरतरिनाथ मंदिर समोर चावडीवर हायमास लाईट सुलतानपुरा चौकातील शकील भाई किराणा दुकान समोर हायमास लाईट सुभेदरपुरा चावडीवर बंडू फुसे किराणा जवळ हायमास लाईट लावणे विशेष 5)वायलीवेस मुस्लिम छोटा कब्रिस्तानचे वॉल कंपाऊंड करणे तसेच टिनशेड बोरिंग करणे
6)नोटरी ॲक्ट गुंठेवारी प्लॉटची नगरपरिषद मध्ये नोंदनि सुरू करण्यात यावी जेणे करून लोकांना घरकुलाचा लाभ घेता येईल .
अशा विविध कामांच्या मागणीचे निवेदन नगर परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले ,यावेळी शहर अध्यक्ष #इरफान_खान , शहर कार्याध्यक्ष सिद्धार्थ हेलोडे, जिल्हा प्रवक्ता ऍड करीम खान, जिल्हा सचिव ऍड मोहसीन खान, शहर उपाध्यक्ष संजय ढगे, संदीप ढगे, निजाम राज ,गजानन ढगे,आरिफ भाई , शे.शोएब, तसेच राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.
0 Comments