*जेष्ठ नागरिकच हे समाजाची धरोहर व आरंभ ऑर्गनायझेशन सदैवं आपल्या पाठीशी असेल . - कॅप्टन सुनिल डोबाळे .*
आकोट मतदार संघातील आकोट जवळच असलेल्या अकोली जहागीर येथे ग्रामीण जेष्ठ नागरिक संघाच्या २०२३ - २४ च्या १७ व्या वार्षिक आमसभेत कॅप्टन सुनिल डोबाळे हे प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित होते त्या प्रसंगी उपस्थितां समोर ते बोलत होते .
आजकाल समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो परंतू तरीही काही सरकारी कर्मचारी त्यांच्या समोर आलेल्या व्यक्तींचे वय काय आहे ? त्यांची समस्या काय आहे ? हे ही जाणून न घेता तसेच त्यांच्या वयाची कद्र न करता त्यांच्याशी असा व्यवहार करतात त्याचा पश्चाताप अशा वयोवृद्ध नागरीकांना होतो व आपण आता सरकार प्रशासन व समाजावर बोज तर नाही ना अशी खंत त्यांना वाटू लागते व ते नैराश्यते मध्ये जावून आपली व्यथा मांडतात . नेमकं त्याच वरमावर कॅप्टन डोबाळे यांनी बोट ठेवले व तुम्ही समाजाचे म्होरके , मार्गदर्शकच नाही तर तुम्ही समाजाचे धरोहर ही अहात असे गौरव उदगार त्यांनी या प्रसंगी जेष्ठ नागरिकांच्या समोर काढलेत .
जेष्ठ नागरीकांना त्यांच्या उतरत्या वयात नुसतं निष्क्रीय राहून सतत घरी घरी च न राहता त्यांनी त्यांचे छंद जपावेत , चौकटीवर येवून गप्पा गोष्ठी माराव्यात , ईतरां सोबत वाद संवाद सतत साधत रहावं , वर्तमान पत्रे वाचणे , नातवंडा सोबत वावरतांना त्यातही आपला आनंद शोधावा तसेच हे सर्व करत असतांना त्यांच्या साठी बसने , उठने व आपल्या सवंगडया सोबत स्वच्छंद गप्पा मारण्या साठी त्यांना त्यांचे हक्काचे विरंगुळा केंद्र असावे असे त्यांचे म्हणणे होते .
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून विद्यमान आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे हेही उपस्थित होते तर विशेष अतिथी म्हणून श्री विणायक राव पांडे अति मुख्य सचिव फेस्कॉम मुंबई यांच्या सह श्री पुरुषोत्तम गावंडे श्री ना मा मोहोड श्री नारायणराव अंधारे श्री जयकृष्ण वाकोडे उपाध्यक्ष अकोला जिल्हा समन्वय समिती श्री राजूभाऊ नागमते श्री राजूभाऊ रावणकार प्रा ए एन खंडारे श्री वसंतराव साळूंके श्री गजानन अकोटकर श्री अरुण वाथे श्री पंकज ढेमरे श्री दामोदर सरोदे व श्री प्रकाश गयधर ही सर्व गणमान्य मान्यवर उपस्थित होते .
शेवटी आयोजकांनी सर्व पाहूण्यांचे आभार मानले व हा कार्यक्रम उत्कृष्ठ व सफल आयोजन करून श्रीकृष्ण उकळकर यांनी आपली परिपक्वता सिद्ध केली.
0 Comments