Advertisement

आर टी ई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास इंग्रजी शाळांची टाळाटाळ..... *पालक संघटने कडून शिक्षणाधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा*

आर टी ई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास इंग्रजी शाळांची टाळाटाळ.....
 *पालक संघटने कडून शिक्षणाधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा*
दि. २६ जुलै २०२४
जळगाव जामोद -
               नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची  इयत्ता पहिली प्रवेशा करिता ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पार पडली .  त्या प्रक्रियेत पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास जळगाव जामोद शहरातील काही इंग्रजी शाळा मात्र टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी पालक संघटनेकडे प्राप्त झाल्या. त्यामुळे संघटनेने गटशिक्षणाधिकारी जळगाव जामोद यांच्यामार्फत शिक्षणाधिकारी बुलढाणा यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
          आर टी ई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत टाकळी पारस्कर येथील मंगेश सुपडा तायडे यांचा मुलगा स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ, जळगाव जामोद या शाळेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत प्रवेशास पात्र ठरला आहे. त्याकरिता सदर्रहू पालक संबंधित शाळेत प्रवेश घेण्याकरता गेले असता भारती फुल झाली असे सांगून  शालेय प्रशासनाने प्रवेशास सफसेल नकार दिला . तसेच कुमारी खुशी संतोष बोदडे व तनुजा विनायक जाणे या दोन विद्यार्थ्यांच्या पालकांना सुध्धा असेच परतून लावण्यात आले.
                    आर टी ई ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत प्रवेश पाञ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे हा शासन आदेशाचा अवमान आहे . तसेच सदर विद्यार्थ्याना  शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे. संबंधित शाळेत योग्य ती समज देऊन प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांना वेळेत प्रवेश देण्यास सूचित करावे , यानंतरही प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास संघटने कडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. तसेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शालेय प्रशासनाची व शासनाची राहील. असे बजावून आंदोलनाचा इशारा पालक संघटने च्या वतीने देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी पालक संघटनेचे अध्यक्ष अजय वानखडे ,  उपाध्यक्ष प्रशांत तायडे , विधी सल्लागार अमर पाचपोर, संघटक विशाल भगत , किशोर दाताळकर व पालक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments