Advertisement

राष्ट्रीय महामार्गावर धावती बस उलटली; १६ प्रवासी जखमी, तिघांना बुलडाणा येथे हलविले. मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

राष्ट्रीय महामार्गावर धावती बस उलटली; १६ प्रवासी जखमी, तिघांना बुलडाणा येथे हलविले.

 मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूरः भररस्त्यावर धावती बस रस्त्याच्या मधोमध उलटली. खिडकीच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. राष्ट्रीय महामार्गावर तांदुळवाडी वळणानजीक फौजी ढाब्यासमोर सोमवारी सकाळी ९:१५ वाजता हा अपघात घडला. त्यामध्ये १६ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांना बुलडाणा येथे हलविण्यात आले. खामगाव आगाराची शेगाव-शिर्डी बस क्रमांक एमएच-४०,

वाय-५५७६ आज सोमवारी सकाळी ८:४० वाजता मलकापूर आगारातून एकूण ३५ प्रवासी घेऊन निघाली होती. धरणगाव येथून सुरळीत धावत असताना पुढे थोड्‌याच अंतरावर ९:१५ वाजता तांदुळवाडी वळणानजीक फौजी ढगाब्यासमोर अचानक ही बस थांबली. पाहता पाहता महामार्गावरील दुभाजका वर उलटली. हा अपघात अचानक घडल्याने बसमधील प्रवाशांना जबर धक्का बसला. तर महामार्गावर वाहतूक ठप्प झाली. या मध्ये शरद बारसू झोपे रा. तळणी, गोविंद माधवराव भारंबे रा. नरवेल, वर्षा माधवराव भारंबे रा. नरवेल, ४माधवराव नारायण भारंबे रा. नरवेल, मंदा पंजाबराव देशमुख रा. वसाडी खुर्द तालुका नांदुरा, ६ वैष्णवी पंजाबराव देशमुख रा. वसाडी खुर्द तालुका नांदुरा असे सहा प्रवाशी जखमी झाले आहे. जखमीवर सामान्य रुग्णालय मलकापूर येथे उपचार सुरू आहे. घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी

घटनास्थळी धाव घेतली. उलटलेल्या बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जीवितहानी टळली मात्र चालकासह १६ प्रवासी जखमी झाले.

Post a Comment

0 Comments