Advertisement

जळगाव जा जनरल प्रॅक्टिशनर असो. निमा असो तसेच केमिस्ट असो तर्फे कॉटन मार्केट ते उपविभागीय कार्यालय पर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला.

कोलकता येथील ऑन ड्युटी डॉक्टर वर बलात्कार आणि हत्या प्रकरणाविरुद्ध देशव्यापी आंदोलनाच्या समर्थनार्थ, आम्ही जळगांव जामोद मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन च्या वतीने आज मोर्चा काढण्यात आला. यावेळी जळगाव जा जनरल प्रॅक्टिशनर असो. निमा असो तसेच केमिस्ट असो तर्फे कॉटन मार्केट ते उपविभागीय कार्यालय पर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी काळी फीत लावत, निषेधाचे बॅनर हातात घेऊन शांततेने तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध मोर्चा संपला. 
   आम्ही सर्व वैद्यकीय व्यवसाय शी निगडित सर्वानी पीडित आणि त्यांच्या कुटुंबासाठी न्यायाची मागणी केली.
    याशिवाय आमच्या निषेधाचा भाग म्हणून आम्ही शनिवार १७/८/२४ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून रविवार १८/८/२४ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत नियमित वैद्यकीय सेवा आणि ओपीडी बंद ठेवली आहे. 
   आम्ही या भयंकर गुन्ह्याचा एकजुटीने निषेध करतो आणि अधिकाऱ्यांकडून कठोर कारवाईची मागणी करतो.
   आजच्या मोर्चात सर्व डॉक्टर, लॅब टेक्निशयन, केमिस्ट यांनी सुद्धा सहभाग नोंदविला.

Post a Comment

0 Comments