Advertisement

सातपुडा ओसाड होन्याच्या मार्गावर. अवैध मेंढ्या चराई तसेच अवैध्य लाकूड कटाई बंद करण्यात यावी अन्यथा म.न.से कडून उपोषणाचा इशारा...

सातपुडा ओसाड होन्याच्या मार्गावर
अवैध मेंढ्या चराई तसेच अवैध्य लाकूड कटाई बंद करण्यात यावी अन्यथा म.न.से कडून उपोषणाचा इशारा...
 जळगाव जामोद प्रतिनिधी 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष नागेश भटकर यांनी आज दिनांक आठ आठ 2024 रोजी उपवनसंरक्षक अधिकारी बुलढाणा यांना निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले  की 
जळगाव जामोद तालुक्यामध्ये   मोठ्या प्रमाणात मेंढी चराई तसेच अवैध वृक्षतोड होत असल्याने सातपुडा पर्वता मधील काही वनस्पती नष्ट होत आहेत तसेच जळगाव जामोद  तालुका अंतर्गत येत असलेल्या सातपुडा  पर्वतामध्ये नवीन  वृक्ष लागवड झालेली असून  मेंढी चराई मुळे नवीन झाडांचे रोपटे नष्ट होत आहेत यासंदर्भात  तोंडी माहिती देऊन सुद्धा वरिष्ठ अधिकारी कोणती दखल घेत नाही याची चौकशी आपण  करावी तसेच जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रम झालेले दिसून येत आहे तसेच आरा मशीनवर सर्रास अवैध आडजात लाकूड कटाई चालू आहे तसेच रन्दा मशीनवर सुद्धा विनापरवाना कटलेल्या लाकडाचेच काम चालू आहे तसेच मध्यरात्रीच्या वेळी अकोट, बावनबीर माळेगाव, तेल्हारा, चांगेफळ, जळगाव जामोद, या सर्व ठिकाणच्या आरा मशीन वरून अवैध्य कटाई केलेले आडजात लाकूड जिगाव टाकळी प्रकल्पामध्ये धाबे बनविण्याकरता  ट्रक भरून नेले जाते लाकडाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे तसेच जळगाव जामोद बुऱ्हानपूर  रोडवरील वनविभागाच्या नाक्यावरून मध्य प्रदेशामध्ये सुद्धा ट्रक भरून अवैद्य आडजात  लाकूड मध्यरात्रीच्या वेळी  पाठविल्या जातात. या सर्व  बाबींची चौकशी करून कार्यवाही करावी .यांच्यावरती कारवाई न झाल्यास महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने 14 ऑगस्ट पासून आपल्या कार्यालयाच्या समोर  गांधीगिरी मार्गाने उपोषण करण्यात येईल  याची सर्व जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments