Advertisement

कृषी उद्यानविद्या तसेच कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा शिवार फेरी 2024 मध्ये सहभाग

*कृषी उद्यानविद्या तसेच कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा शिवार फेरी 2024 मध्ये सहभाग*

जळगाव जामोद: नागेश भटकर 
सातपुडा शिक्षण संस्था, जळगाव जामोद संचालित तथा डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय, स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय तसेच कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, जळगाव जामोद येथील विद्यार्थ्यांनी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत *शिवार फेरी 2024* कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

विद्यापीठ स्थापना दिनाचे औचित्य साधून डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत दिनांक 20 ते 22 सप्टेंबर 2024 या दरम्यान *शिवार फेरी कार्यक्रम* आयोजित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सदर शिवार फेरीमध्ये सहभाग घेऊन लाभ घेणे अनिवार्य आहे तसेच आपल्या परिसरातील शेतकऱ्यांनी सुद्धा लाभ घेणे आवश्यक आहे. 

विद्यापीठातील प्रक्षेत्रावरील संशोधन, पीक प्रात्यक्षिके, विविध प्रकारच्या पिकांच्या जाती, बीजोत्पादन कार्यक्रम, फळे, भाजीपाला व फुलांच्या जाती, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, शेती उपयोगी नवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकरी तसेच विद्यार्थ्यांना शिवार फेरी कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाली तसेच आपल्या प्रदेशातील कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने आणि संधी यावर चर्चासत्रांचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.

तीनही महाविद्यालयातील जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी शिवार फेरीला भेट देऊन आपला सहभाग नोंदविला आणि सदर शिवार फेरीच्या माध्यमातून आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना शिवार फेरीच्या माध्यमातून कसा लाभ होईल आणि शेतकरी कसा समृद्ध होईल, याबाबत सर्व विद्यार्थी तत्परतेने सदैव प्रयत्नशील असतील, असे प्रतिपादन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई यांनी व्यक्त केले होते. विद्यार्थ्यांसोबतच महाविद्यालयातील प्रा.प्रमोद डव्हळे, प्रा.दिपक सोनुने, प्रा.मयूर राक्षे, प्रा.कु.नम्रता खिरोडकर, डॉ.निलीमा सदनशिव, डॉ.अनिकेत उमाळे, प्रा.कु.अनुराधा चोपडे, प्रा.वैभव हागे, प्रा.दत्ता तायडे, प्रा.कु.सोनाली चव्हाण यांनी सुद्धा शिवार फेरीमध्ये सहभाग नोंदवून उपस्थित विद्यार्थ्यांना शिवार फेरी दरम्यान मोलाचे मार्गदर्शन सुद्धा केले.

Post a Comment

0 Comments