Advertisement

ट्रॅक्टर अपघात दुर्घटनेतील जखमीची मा. आ. चैनसुख संचेती यांनी घेतली भेट.

ट्रॅक्टर अपघात दुर्घटनेतील जखमीची मा. आ. चैनसुख संचेती यांनी घेतली भेट.


वाडी महाळुंगी ता.नांदुरा येथील कामगार फुली ता. नांदुरा येथून ट्रॅक्टर क्र. एमएच ४० ए ३४८७ ने सिमेंटचे पोल घेऊन बोराखेडी-वडगाव रोडने जात असतांना पुन्हई फाट्याजवळील वळणावर पलटी झाले. त्यावेळी ट्रॉलीमधील सिमेंटचे ११ पोल अंगावर पडल्यामुळे रामदास बेलोकार (वय ४०), संतोष बेलोकार (वय ३५), हरीश बेलोकार (वय २३),

मंगेश सातव (वय ३२), शुभम खंडारे (वय २१) हे कामगार पोलखाली दबून गंभीर जखमी झाले. त्यापैकी मंगेश सातव व रामदास बेलोकार ह्यांचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान आज २५ सप्टेंबर रोजी मा. आ. चैनसुख संचेती यांनी जखमींची मलकापूर येथील डॉ. अच्युत फिरके यांच्या आस्था रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या तब्येतीविषयी डॉ. फिरके यांच्याशी चर्चा करून विचारपूस केली.

Post a Comment

0 Comments