Advertisement

सकल धनगर समाज जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर

*सकल धनगर समाज जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर* 

 जळगाव जा.-   महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज पिढ्यान पिढ्या मेंढपाळ आणि पशुपालक म्हणून कार्य करत आहे. 1956 साली अनुसूचित जमातीच्या sc-st यादी धनगड  जमात दाखल करण्यात आली. ज्यामुळे धनगर जमात गेल्या 68 वर्षापासून त्यांच्या संविधानिक हक्कापासून वंचित राहिली आहे. धनगर नावाची जमात अस्तित्वात नसतानाही चूक घडली आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात तीन वेळा स्पष्ट केले आहे की धनगर जमात अस्तित्वात नाही मात्र धनगर समाज अस्तित्वात आहे. त्यामुळे धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याकरता शासनाने त्वरित शासन निर्णय काढणे . पंढरपूर लातूर आणि नेवासा 13 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. त्या उपोषणकर्त्यांची तब्येत अत्यंत चिंताजनक असून धनगर जमात बांधवांच्या भावना तीव्र आहेत. पंढरपूर येथील आंदोलन दरम्यान तीन व्यक्तींनी आत्महत्याचा प्रयत्न केला आहे. 15 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत मुख्य मंत्री महोदयांनी धनगर समाजाला असून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शासन निर्णय काढण्याचे  आश्वासन  दिले होते परंतु आतापर्यंत अनेक सरकारांनी धनगर जमातीचे केवळ समित्या, अहवाल आणि अभ्यास करून बऱ्याच  वेळा दिशाभूल केली आहे तसेच अजूनही सरकार केवळ देखावा व वेळ काढू पणा करत नाही का अशा भावना होऊ लागल्या आहेत तरी संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या भावना लक्षात घेता धनगर समाजाची एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून ताबडतोब एसटीचे प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले
 यावेळी तालुक्यातील चंदाताई पुंडे दिलीप भिवटे प्रमोद सपकाळ विठ्ठल पाचपोर शिवदास सोनोने  हरिभाऊ वसतकार  निलेश साबे प्रमोद तितरे अरुण बोळे  अंबादास वसतकर निलेश खाळपे  गजानन वाघमारे भागवत खाळपे शरद देवळे नंदकिशोर बोळे श्रीराम सुशिर तुकाराम पुंडे दुर्गेश दिवनाले तुळशीराम पाचपोर रवींद्र गावंडे  रमेश वसतकार विजय खाळपे  रामेश्वर मोळे बळीराम बोरसे विनोद काळंगे रामदास सुशीर गजानन वसतकार विजय काळंगे  अजय देवळे इत्यादी समाज बांधव  उपस्थित होते

Post a Comment

0 Comments