प्रती,
१) मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र
२) मा. आरोग्य मंत्री महाराष्ट्र
३) मा. आदिवासी मंत्री महाराष्ट्र
४) मा. गृहमंत्री महाराष्ट्र
मार्फत:- मा. पोलीस अधीक्षक अकोला.
विषय:- पंढरपूर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यातील शंकरराव पारेकर यांची पैदल वारी. पैदलवारीतील युवकासाठी अकोला पंढरपूर मार्गावरील गावातील धनगर समाज बांधव हजारोच्या संख्येने संख्येने सहभागी होणार .
महोदय,
मी श्री. शंकर बापुराव पारेकर रा. अकोला
यांनी अकोला ते पंढरपूर
धनगर समाज आरक्षणासाठी पैदल वारी करण्याचा निर्धार घेतला आहे. तसेच सर्व समाज बांधवांना विनंती आहे की, आपल्या उपोषणकर्ते पंढरपूर येथे बसताना बसणाऱ्या व्यक्तींना पाठिंबा देण्याकरीता आपणही तिथे जायला पाहिजे हे लढा एकट्याचा नाही एकजुटीचा आहे माझा प्रवास 21 दिवसाचा प्रवास पाचशे किलोमीटर आहे. मी माझा प्रवास करत आहे तरी आपणही सर्व महाराष्ट्रातल्या धनगर समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने आपली उपस्थिती पंढरपूर येथे देण्याची गरज आहे पाठिंब्याशिवाय कुठलेही कार्य होत नाही अशी मागणी शंकर पारेकर मल्हार महासंघ विदर्भ अध्यक्ष करत आहेत मी माझा प्रवास एकट्याने करत आहे तो एकजुटीने न करता एकाच व्यक्तीने दोन कोटी धनगर समाज एकत्र होऊन आपल्या धनगर एसटी आरक्षण मिळायलाच पाहिजे. मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही हा माझा निर्धार मी पोस्टपणे शासनाला मांडू इच्छितो शासनाने दखल घेऊन गंभीरतेने दखल घेऊन आमची मागणी पूर्ण करावी अशी मागणी शंकर पारेकर धनगर समाजाच्या वतीने करत आहेत
मागणी करण्याचे कारण की, माझे सहा धनगर समाज बांधव योद्धा पंढरपुर येथे उपोषणाला बसलेले आहेत तरीही अजून पर्यंत शासनाने काहीही दखल घेतलेली नाही. शासनाने दखल न घेतल्यास शासन जबाबदार राहणार असे ठामपणे आवाहन करत आहे. मी पंढरपूरला पाचशे किलोमीटर प्रवास करणार आहे मिळेल ते अन्न खाणार कोणाकडे मागणार नाही आणि मी माझ्या पायीने स्वतंत्र एकजुटीने पायवारी करून पंढरपूरच्या चरणी पांडुरंगा चरणी साकडं घालणार आहे की माझ्या विठुराया आता तरी आमच्याकडे बघ गेल्या 70 वर्षांपूर्वी आम्ही तुझ्याकडे साकडे घालत आलो आहे. आज तुझ्याकडे साकडे घालण्याचा एकमेव धोरण आहे की आम्हाला आरक्षण मिळायलाच पाहिजे आरक्षण आम्हाला नकोय आम्हाला आमचं एसटी आरक्षण प्रमाणपत्र हवे एसटी आरक्षण पत्र आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही आमची माघार घेणार आहे. मी पंढरपूरचे चंद्रभागेमध्ये स्नान करून चंद्रभागेचे स्नान झाल्यानंतर मी पांडुरंगाच्या चरणी पांडुरंगाच्या पायरीवर बसून उपोषण करताना पांडुरंग प्रमाणपत्र मिळेल अशी अपेक्षा करणार आहे न मिळाल्यास सातवा उपोषणकरता मी राहणार आहे.
पैदल वारीचे ठिकाण :- अहिल्यादेवी चौक जिल्हाधिकारी कार्यालय अकोला
पैदल वारीची वेळ:- सकाळी 11वाजता
पैदल वारीची दिनांक:- 14/09/24
पैदल वारीचा एकुण कालावधी:- अंदाजे 21 दिवस
पैदल वारीचा मार्ग:-
अकोला ते पंढरपूर
बाळापुर मार्गे ,भोजने महाराज, शिरला, जानेफळ, मेहकर, लोणार, मंठा, चौसाळा, उस्मानाबाद, भूम, सोलापूर
रुपरेषा:-
पहिला जिल्हा अकोला, दुसरा बुलढाणा, तिसरा परभणी, चौथा बीड, पाचवा उस्मानाबाद
अशा पाच जिल्ह्यात प्रवेश करून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
आपला विश्वासू
शंकर बापुराव पारेकर
जुने शहर शिवनगर गजानन महाराज मंदिर समोर अकोला 444002
मो:- 9765013038
दिनांक:- 13/09/24
ठिकाण:- अकोला.
0 Comments