मतदार संघातील नवदुर्गा उत्सव मंडळांनी केला डॉ. सतिश शिरेकार यांचा सत्कार.
मतदार संघातील नवदुर्गा उत्सव मंडळांना सदिच्छा पर भेट.
जळगाव जामोद तालुक्यातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते, युवा समाजसेवक डॉ. सतिश प्रल्हाद शिरेकार हे गेल्या बारा वर्षापासून मतदार संघातील तिन्ही तालुक्यांमध्ये आपल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून तसेच समाजसेवेच्या माध्यमातून जनतेची अविरत सेवा करत असतात. त्याच्यामुळे डॉ. सति श प्रल्हाद शिरेकर यांची लोकप्रियता प्रभाव खूप जास्त आहे.
त्या अनुषंगाने नवरात्र उत्सव चालू असताना जळगाव जामोद संग्रामपूर शेगाव तालुक्यातील सर्व नवदुर्गा उत्सव मंडळांनी डॉ. शिरेकार यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून आपापल्या मंडळामध्ये डॉ. शिरेकार यांच्या हस्ते आरती करण्याची विनंती केली, असता त्यांच्या विनंतीला मान देऊन मतदार संघातील सर्व मंडळांना भेटी देऊन प्रत्येक मंडळाचे आरती केली.
एका सामान्य आणि सर्वसामावेशक शेतकरी कुटुंबाचा वारसा असलेल्या एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाने 29 9 2024 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, यांच्या विचारधारेवर चालणारे राजकीय पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षांमध्ये प्रवेश केल्यामुळे मतदारसंघातील सर्व नवदुर्गा उत्सव मंडळाच्या दरम्यान सह पत्नी यांच्या हस्ते आरती करतेवेळी डॉ. सतिश शिरेकार यांचा शाल श्रीफळ आणि टोपी रुमाल देऊन त्यांचा मंडळाच्या वतीने स्वयंस्फूर्तीने सत्कार केला आणि पुढच्या राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मतदारसंघातील नवदुर्गा उत्सव मंडळांनी मतदारसंघातील जनतेने मतदार संघात चालू असलेल्या सर्वसामान्य जनतेला गंडवण्याच्या राजकीय भूमिकेमुळे तसेच शेतकरी, शेतमजूर ,कष्टकरी, कामगार, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, छळ होत असल्यामुळे मतदार संघातील जनतेने डॉ. शिरेकार तुम्हीच आम्हाला न्याय द्या अशी आशा अपेक्षा व्यक्त करत, पुढील राजकीय वाटचालीस स शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ. सतिश शिरेकार यांनी सर्व नवदुर्गा उत्सव मंडळाचे आभार मानले.
0 Comments