Advertisement

जळगाव जामोद नागरिकांना जळगाव पोलीस स्टेशन कडून महत्त्वपूर्ण सूचना

जळगाव जामोद नागरिकांना जळगाव पोलीस स्टेशन कडून महत्त्वपूर्ण सूचना
जळगाव जामोद शहरातील नागरिकास करण्यात येते की दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 8-30 वाजेचे सुमारास जळगाव जामोद येथे गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असताना वायलीवेस भागातील मस्जिद जवळ विसर्जन मिरवणूक आली असता डिजेच्या गाडीमधील ब्लोअर मधून रंगीबेरंगी  कागदी पताका हवेमध्ये उडवीत असताना काही कागदी पताका मस्जिद जवळ  गेल्याने तेथे वाद झाला होता नंतर गणेश विसर्जन मिरवणूक चौभाऱ्याकडे गेल्यानंतर दगडफेक सुरू झाली व त्या दगडफेकीमध्ये कार्यकर्ते पोलीस जखमी झाले तसेच त्यामध्ये काही खाजगी वाहने व सरकारी सीसीटीव्ही यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होऊन पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहे दुर्गादेवी विसर्जन मार्ग म्हणून जळगाव जामोद येथील जातीय दृष्ट्या संवेदनशील अशा संत रुपलाल नगर ते वायली वेस तसेच ताटीपुराकडे जाणारा रोड व चौभारा गल्लीमध्ये दोन पेक्षा जास्त लोकांनी एकत्रितरित्या फिरू नये याकरिता मा उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांनी आदेश दिल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता चे कलम 163 (3) अन्नावे दिनांक 14 10 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते रात्री विसर्जन मिरवणूक संपे पर्यंत आणि गल्लीमध्ये दोन पेक्षा जास्त लोकांनी एकत्रित रित्या फिरू नये असा आदेश पारित केला आहे सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल सदर आदेशा कर्त व्यावर सर्व अधिकारी कर्मचारी संबंधित दंडाधिकारी शासकीय व निम शासकीय कर्मचारी यांना लागू राहणार नाही सदर आदेश हा जळगाव जामोद येथील दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर आपोआप संपुष्टात येईल

Post a Comment

0 Comments