Advertisement

हीवरखेडच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही*आमदार भारसाकळे

*हीवरखेडच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही*
आमदार भारसाकळे 

*हीवरखेड येथे 24 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न*


 बाळासाहेब नेरकर कडून
- हिवरखेड ला शहराचा दर्जा प्राप्त झाला असला तरी हिवरखेडला खऱ्या अर्थाने शहर करण्यासाठी लागणारा विकास निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश भारसाकडे यांनी केले ते हिवरखेड येथील सदाशिव संस्थांच्या प्रवेशद्वार व सौंदर्य सौंदर्यकरणाच्या भूमिपूजना दरम्यान बोलत होते. यावेळी हिवरखेड व परिसरातील तब्बल 24 कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन व सोहळा पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिवरखेड येथील माजी जि प सदस्या सुलभा दूतोंडे ह्या होत्या तर प्रमुख उपस्थितीमध्ये अकोट विधानसभा विस्तारक रमेश दूतोंडे, अकोट विधानसभा संयोजक उमेश पवार, तेल्हारा तालुका अध्यक्ष गजानन उंबरकर हे होते. यावेळी वार्ड क्रमांक 2 येथिल सुधाकर भटकर ते सत्यदेव वानखडे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता 15 लक्ष रुपये, वार्ड क्रमांक 2 येथिल हनुमान मंदिर ते श्रीकृष्ण वाकोडे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रेट रस्ता 15 लक्ष रुपये, वार्ड क्रमांक 4 येथिल मिलिंद भोपळे ते बंडू ओरिवकर यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता १५ लक्ष रुपये, वार्ड क्रमांक 1 येथिल राशिद खान ते कब्रस्तान सिमेंट काँक्रेट रस्ता १५ लक्ष रुपये, वार्ड क्रमांक 1 येथिल तन्ना मॅडम ते सतीश बोर्डे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रेट रस्ता 10 लक्ष रुपये, श्री क्षेत्र सदाशिव संस्थान सामाजीक सभागृह व सौंदर्यकरण 50 लक्ष रुपये, वार्ड क्रमांक 2 येथिल आठवडी बाजार जवळील लेंडी नाल्यावरील पुलाचे लोकार्पण 1 कोटी रुपये, हिवरखेड ते चिचारी ते चंदनपुर ते धोंडाआखर सिमेंट काँक्रीट रस्ता 21 कोटी 27 लक्ष रूपये, तळेगाव बाजार येथील अंतर्गत रस्ता 35 लक्ष रुपये, तळेगाव खुर्द येथील अंतर्गत रस्ता 35 लक्ष रुपये, मालठाना बु येथील अंतर्गत रस्ता १५ लक्ष रुपये असा एकूण 24 कोटी 32 लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र कराळे सर यांनी प्रास्ताविक रमेश दुतोंडे यांनी तर आभार किरण सेदानी यांनी मानले. या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याला हिवरखेडवासी, व्यापारी संघाचे पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सदाशिव संस्थान समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments