Advertisement

अवैधरित्या विकली जाणारी दारु बंद करा.. अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार..उटी ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा...

अवैधरित्या विकली जाणारी दारु बंद करा.. अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार..उटी ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम उटी खुर्द व उटी बुद्रुक येथील महिला व ग्रामस्थांनी जळगाव पोलीस स्टेशन गाठून गावातील अवैधरित्या विकली जाणारी देशी विदेशी दारू विक्री बंद करा या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन लेखी तक्रारींचे निवेदन दिनांक १९ आक्टोंबर रोजी दिले आहे. यामध्ये येथील महिला व पुरुषांनी गावातील देशी विदेशी दारू विक्री करणारे विनोद गटमणे व सैनिक ढाब्याचे मालक अनंता शेवाळे यांच्या विरोधात लेखी तक्रार दिली आहे.. सदर तक्रारी येथील गावकऱ्यांचे म्हणणे आहे की गेल्या काही महिन्यापासून आमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या देशी-विदेशी दारूची विक्री होत असून त्यामुळे गावातील तरुण मुले प्रौढ माणसं ही व्यसनाधीन झाली असून त्यामुळे कित्येकांचे संसार उध्वस्त होत आहेत. तसेच गावातील पोलीस पाटील संदीप गटमने यांच्या सख्ख्या चुलत भावाचा दारूचा व्यवसाय असल्याने कोणताच पोलीस कर्मचारी किंवा एस पी आमची काही वाकडे करू शकत नाही असा दम देतो असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. पोलीस पाटील हे आपल्या पदाचा गैरवापर करून गावात अवैध देशी दारू विक्रीसाठी चालना देत असून यामुळे गावातील वातावरण दूषित होत आहे. तसेच दारू पिऊन गावातील तरुण मुलींना त्रास देत असून काही दारुडे अश्लील भाषेत अश्लील चाळे करतात त्यामुळे मुलींच्या ही सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून उटी खुर्द उटी बुद्रुक येथील तरुणांचे भविष्य अंधारात आहे त्यामुळे या दोन्हीही अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांचा व्यवसाय बंद करावा अन्यथा आम्ही या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू असा इशारा येथील नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. यावेळी गावातील मनीष इंगळे, गजानन उमाळे, विष्णू उमाळे, दत्तू मानकर ,बाळकृष्ण उमाळे, सुनील इंगळे, हर्षद आढाव ,संजय उमाळे, ऋषिकेश उमाळे, अस्मिता उमाळे भाग्यश्री इंगळे शुभांगी उमाळे आशा उमाळे अनुराधा उमाळे संगीता उमाळे सुलभा इंगळे मोहिनी इंगळे प्रमिला मानकर लताबाई उमाळे सीमा उमाळे इंदुबाई उमाळे भारतीय उमाळे, कैलास गटमणे, दादाराव धंदाळे, सुनील लांडे, सुधाकर गटमने, तुकाराम गटमने, बाळकृष्ण इंगळे, समाधान इंगळे, पूर्णाजी धुंदाळे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ यावेळी पोलीस स्टेशनला उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments