दिनांक २०/१०/२०२४ रोजी विद्यादीप रिजेन्सी सेवाग्राम रोड वर्धा येथे तीन वाजता बहुजन समाज पार्टीच्या वतीने विदर्भस्तरीय उमेदवारी मुलाखत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जळगाव जामोद मतदारसंघातील सुनगाव येथील विनोद सुखदेव इंगळे जळगाव जामोद विधानसभा 27 मतदार संघासाठी त्यांची उमेदवारी मुलाखत संपन्न झाली यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी नर्मदा प्रसाद अहिरवार साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनीलजी डोंगरे साहेब तसेच ओबीसीचे नेते बिले साहेब तसेच बुलढाणा जिल्हा प्रभारी धरमपाल जी इंगळे साहेब जिल्हा अध्यक्ष विलासजी तायडे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग गवई जळगाव जामोद विधानसभा अध्यक्ष संतोष भगत यांचे उपस्थितीत वर्धा येथे कार्यक्रम पार पडला विनोद सुखदेव इंगळे सूनगाव यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपला उमेदवारी मागणी अर्ज सादर केलेला आहे बहुजन समाज पार्टीच्या जळगाव जामोद विधानसभा 27 मतदार संघासाठी उमेदवार म्हणून जवळपास त्यांची निश्चिती झालेली आहे व ते लवकरच उमेदवारी अर्ज भरून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले
0 Comments