डॉ सुनील पवार यांचा सह्दय सत्कार सोहळा
(देराजा प्रतिनिधी) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये मेहकर येथील सुप्रसिद्ध कवी डॉ. सुनील श्रीराम पवार यांच्या 'प्रार्थना' या कवितेचा समावेश झाल्याबद्दल त्यांचा स्नेहपूर्ण हृदय सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
याप्रसंगी अमरावती मराठी अभ्यासमंडळाचे मा.अध्यक्ष प्राचार्य डॉ. गजानन जाधव, संत चोखामेळा सागरचे प्रणते कमलेश खिल्लारे, सकाळचे सिद्धहस्त पत्रकार मुशीरखान कोटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून फुलून आलेली पवार यांची कविता थेट विद्यापीठ स्तरावर गेली. ही बुलढाणा जिल्ह्यासाठी गौरवास्पद बाब असल्याचे उद्गगार मान्यवरांनी काढले. तसेच सत् कार्याचा सत्कार करण्यासाठी मनाचा मोठेपणा प्रत्येकाच्या ठाई असावा. साहित्यिक आणि वैचारिक चळवळ जिवंत ठेवण्यासाठी असे कार्यक्रम होत राहावे. असेही मत मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.आपल्या माणसाची कौतुकाची थाप पडते तेव्हाच यशाला पूर्णत्व प्राप्त होत असते. हा सत्कार सोहळा माझ्या लेखणीला निश्चितच बळ देणारा असल्याचे मत सत्काराला उत्तर देताना पवार यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, प्राचार्य विठ्ठलराव टेकाळे होते. सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक अंनिसचे प्रदीप हिवाळे, सूत्रसंचालन श्रीमंत निकाळजे, तर आभार प्रदर्शन विश्वास लोखंडे यांनी केले.
0 Comments