*जनता विद्यालय जामोद येथे 24 वर्षांनी वर्गमित्रांचे गेट-टुगेदर*
जामोद येथील जनता विद्यालय, जामोद सन 2000-2001 यावर्षी वर्ग दहावीच्या वर्गात एकत्र शिक्षण घेतलेल्या सर्व वर्ग मित्रांनी दिवाळी सणाचे औचित्य साधून गेट-टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 4-11-2024 रोजी केले होते. त्यामुळे तब्बल 24 वर्षांनी सर्व वर्गमित्रांचा एकत्र भेटण्याचा योग आल्याने सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या शाळेत इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत एकत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी परीक्षा देऊन सन 2001 साली या शाळेतून पुढील शिक्षण घेण्यासाठी या विद्यार्थ्यांनी ही शाळा सोडली होती. पुढील शिक्षण, नोकरी, व्यवसाय या निमित्ताने हे विद्यार्थी एकमेकांपासून दूर गेले होते. परत एकदा आपण एकत्र भेटावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन या विद्यार्थ्यांनी जनता विद्यालय जामोद या शाळेत केले होते. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री अनिल रंदळे, श्री दिनेश धूर्डे, मीना बारींगे (ढगे) व शोभा बोडखे (गुजर) हे होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री समाधान दामधर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तत्कालीन शिक्षक तथा जनता विद्यालय जामोद चे मुख्याध्यापक श्री राजेंद्र सिंह राजपूत सर हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून तत्कालीन शिक्षक श्री विठ्ठल सावळे सर, श्री सुखदेव थोटे सर, श्री ललित चांडक सर, श्री तुकाराम फुसे सर (लिपिक) शिपाई श्री मनोहर दाभाडे, श्री उखर्डा सोळंके, श्री हकिराम बारेला व श्री वसंत धुर्डे सर (प्रवीण कोचिंग क्लासेसचे संचालक) उपस्थित होते.
सर्वप्रथम शालेय जीवनामध्ये जे शिक्षक शिकवत होते त्यापैकी काही शिक्षकांनी या जगाचा निरोप घेतला अशा शिक्षकांना तसेच सोबत शिक्षण घेत असताना काही कालावधीनंतर तीन वर्गमित्रांनी या जगाचा निरोप घेतला अशा वर्ग मित्रांना सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर क्रमवारी एकमेकांचा परिचय, सध्या काय करत आहे व शालेय जीवनातील काही गमतीदार किस्से सांगत परिचय दिला. त्यानंतर सर्व वर्ग मित्रांनी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे, अडीअडचणीच्या वेळेस काही मित्रांना गरज भासल्यास आर्थिक मदत करायची, ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहायचे, एकमेकांना सहकार्य करायचे असे ठरले.
तदनंतर उपस्थित सर्व अध्यापकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजेंद्रसिंह राजपूत सर यांनी विद्यार्थी हेच माझे दैवत असल्याचे सांगून, विद्यार्थी व शिक्षकांच्या नात्याबद्दलचा उलगडा केला तसेच शाळेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच विद्यार्थ्यांनी गेट-टुगेदर चा कार्यक्रम ठेवला त्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त करून सदर बाब अभिमानास्पद असून इतर सर्व विद्यार्थ्यांनाही प्रेरणादायी ठरणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. अमोल धूर्डे यांनी केले. शेवटी सर्वांनी एकत्रित स्नेहभोजन करून आनंदात हसत एकमेकांचा निरोप घेतला.
यावेळी संतोष कळमकार, डॉ. नितीन इंगळे, शेख सलीम शेख इस्माईल, ॲड. अमोल , संदीप ताथोड, रवी उमाळे ,
चेतर सिंग डाबेराव , राजू ढगे, सुनील जावळे, प्रमोद रंदळे
कैलास राऊत, ग्यानसिंग बामणे, राजू काटोले, अनिल रंदळे,
दिनेश धूर्डे, संतोष बेंदरकार, समाधान दामधर, समाधान धुर्डे,डॉ.अमोल धुर्डे,विजय गांधी ,अनंता बोडखे ,भास्कर दलाल, निलेश राऊत, मोहन ढगे ,संतोष काळपांडे ,सुभाष वानखडे ,महेंद्र जाधव, योगेश पाटील, धम्मपाल हातेकर, किशोर जयस्वाल ,ज्ञानेश्वर आंबेडकर ,ममता राठी ,मीना बारिंगे ,राधा राठी ,शोभा बोडखे ,उज्वला बोबडे ,पुष्पा हिस्सल, सरिता कुवर ,छाया वानखडे ,सुनिता भगत, पुष्पा धुर्डे,रेखा केदार ,ज्योती दामधर
इत्यादी २००१ चे १० वी चे विद्यार्थी उपस्थीत होते.
0 Comments