Advertisement

स्व यमुना बाई शंकरराव बानाईत यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

स्व यमुना बाई शंकरराव बानाईत यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद  शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप 

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा सातबारा हाॅटेलचे मालक रमेश भाऊ बानाईत यांच्या मातोश्री स्वर्गीय यमुना बाई शंकरराव बानाईति यांच्या आठव्या स्मूर्ती पित्यार्थ दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सुनगाव येथील जिल्हा परिषद उच्च मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच जिल्हा परिषद वरिष्ठ उच्च प्राथमिक शाळेत भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रस्ताविकेचे पूजन करण्यात आलेयावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर धुळे हे होते त्या प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश बानाईत विजय वडाळे पांडुरंग गवई तंटामुक्ती अध्यक्ष शालिग्राम भगत डॉक्टर शालिग्राम कपले पत्रकार अनिल भगत माजी सरपंच अयुब तळवी पत्रकार विनोद वानखेडे सुनील गवई शाळेचे मुख्याध्यापक राखोडे सर अनिल वसुले श्रीराम मिसाळ हे होते  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका क्षीरसागर मॅडम यांनी केले तर आभार शाळेच्या शिक्षिका साबे मॅडम यांनी मानले यावेळी शिक्षक बेगसर यांनी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश बानाई यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले यावेळी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा व उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवराचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी विद्यार्थ्यांना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश बानाईत व मान्यवराच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना लेटर व पेन यासह खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख मजहर सर साबे मॅडम शिक्षक जाफरबेग बोंबटकार मॅडम गवई मॅडम घुले मॅडम उमाळे मॅडम स्वाती वसुले मनोहर वानखेडे राजू अंदुरकर व शाळेचे बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती

Post a Comment

0 Comments