विविध योजनेतील लाभार्थ्यांनी बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करा : तहसीलदार चव्हाण
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्यांचे अनुदान महाडीबीटी प्रणालीद्वारे वितरीत करण्याच्या शासनाच्या सूचना असून त्या अनुषंगाने योजनेतील लाभाथीर्नी बँक खाते आधार क्रमांकाशी मोबाइलवर संलग्न करुन घ्यावे, असे आवाहन प्रभारी तहसीलदार विजय चव्हाण यांनी केले.
संजय गांधी निराधार व श्रावण बाळ सेवा राज्य निवृती वेतन योजना अंतर्गत पात्र लाभाथीर्ना महाडीबीटी प्रणालीद्वारे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. बँक खाते व मोबाइल क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्न
नसल्यास लाभाथीर्ना लाभ प्राप्त होणार नसल्याचे सूचना शासन स्तरावर निर्गमित झाल्या आहेत. ज्या लाभाथीर्नी या अगोदर माहिती दिलेली असेल त्या व्यतिरिक्त इतर सर्व लाभाथीर्नी तलाठी, कोतवाल यांच्याकडे अपडेट आधार कार्ड, मोबाइल क्रमांक, रेशन कार्ड, अपंग प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, वयाचा पुरावा, ही कागद पत्रे तीन दिवसात सादर करावे.
0 Comments