Advertisement

कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना मातोश्री नथियाबाई विद्यालयात अभिवादन...

*कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना मातोश्री नथियाबाई विद्यालयात अभिवादन...*

जळगाव जामोद प्रतिनिधी-

सुनगाव येथील अमरावती विद्याभारती शैक्षणिक मंडळाद्वारे संचलित मातोश्री नथियाबाई विद्यालयात आज दिनांक २० डिसेंबर रोजी कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमई आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मातोश्री नथियाबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय इंगळे यांनी राष्ट्रसंत कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय इंगळे हे होते तर विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका घोटेकर मॅडम तसेच आढाव सर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी केलेल्या कार्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय इंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर एस डब्ल्यू इंगळे यांनी माता भिमाई व संत गाडगेबाबा यांच्या जीवन चरित्राबद्दल सविस्तर असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा कसे कीर्तनाच्या माध्यमातून जनतेला स्वच्छतेचे महत्व तसेच देव देवळात नाही माणसात आहे याबद्दल त्यांनी केलेल्या भाषणात सांगितले. तसेच यावेळी विद्यालयातील पाच ते दहा च्या विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा यांनी केलेल्या कार्याबद्दल भाषणे तसेच अभंगाचे गायन केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक एस डब्ल्यू इंगळे यांनी केले. यावेळी विद्यालयातील शिक्षक फोलाने सर, राजपुत मँडम, डिके सर, अतुल पाटील सर, गवई मॅडम, उमेश पाटील सर,कुलट सर, लिपिक निखिल धुळे, एस व्ही राजपुत, रामेश्वर कुनगाडे, विशाल वसूलकार यांच्यासह विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments