Advertisement

सुनगाव येथे मंडळ स्तरीय महसूल अदालत संपन्न

सुनगाव येथे मंडळ स्तरीय महसूल अदालत संपन्न
जळगाव जा 6- 
डॉ  किरण पाटील जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या संकल्पनेतून सुनगाव येथील जिल्हा परिषद शाळेत दिनांक 6 मार्च रोजी मंडळ स्तरीय महसूल अदालत संपन्न झाली सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद शैलेश काळे ,तहसीलदार पवन पाटील हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुनगाव सरपंच रामेश्वर अंबळकार हे होते या कार्यक्रमाचे उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते विविध योजनांचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी अँग्रीस्टॅक, पांदण रस्ते,जिवंत सातबारा, पुरवठा विभाग, मतदार यादी अद्यावतीकरण याविषयी उपस्थियाना मार्गदर्शन केले तसेच माहिती देऊन जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन नागरिकांना केले तर तहसीलदार पवन पाटील यांनी महसूल विभागच्या विविध स्टॉलला भेट देऊन महसुली अदालतीचा फायदा घ्यावा असे सांगितले तसेच उपस्थित नागरिकांच्या प्राप्त अडचणी तात्काळ सोडवल्या याप्रसंगी जिल्हा परिषद शाळा सुनगाव येथील हॉलमध्ये विविध प्रकारचे स्टॉल जसे पुरवठा, निवडणूक, अँग्री स्टॅग ,आधार दुरुस्ती शिधापत्रिका विषयी तसेच इतर महसूल योजना  इत्यादी विषयी स्टॉल लावण्यात आला,  याप्रसंगी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजर राहून आपले विविध दाखले घेऊन या कार्यक्रमाचा लाभ घेतला यामध्ये ॲग्रीस्टाग 82 शेतकऱ्यांनी  आयडी कार्ड काढले, आधार दुरुस्ती 9, शेतकरी आधार अपडेट 7, पुरवठा  विषयी 40 अर्ज यावेळी निकालात काढण्यात आले. तात्काळ विविध 19 टाकले वितरित करण्यात आले. यावेळी संजय गांधी योजनेचे डीबीटी साठी 107 कागदपत्रे जमा करण्यात आले निवडणूक विषयी नमुना सहा अर्ज स्वीकारण्यात आले. या कार्यक्रमाचा विशेष उपस्थितीमध्ये नायब तहसीलदार मार्कंड ,नायब तहसीलदार कीटे ,नायब तहसीलदार भुजबळ मंडळ अधिकारी व्ही एस शिंदे, मंडल अधिकारी व्ही एस खेडेकर हे होते 
कार्यक्रमाच्या यशस्वी साठी कृषी मित्र मोहन राजपूत अशोक काळपांडे महादेव धुर्डे ,पुंडलिक पाटील ,गुणवंत कपले, आवजी सिद्ध महाराज संस्थानचेअध्यक्ष सुरेश आंबडकार, शालिग्राम भगत, मुख्याध्यापक वाकेकर तसेच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी व पत्रकार बंधू यांनी सहकार्य केले याप्रसंगीत तहसील कार्यालयातील श्री आठवले ,पुरवठा निरीक्षक श्री भरत बगन,पुरवठा विभाग नितीन वाघ ,निवडणूक विभाग, अनंता भटकर संजय गांधी योजना हे सर्व व इतर बी एल ओ  उपस्थित होते,
याप्रसंगी सुनील भगत सेतू चालक, अर्जुन ढगे, स्वप्नील तेटू ,भास्कर कोथळकर , स्वप्निल दामधर ,सुनील जावळे, वैभव शेळके यांनी हजर राहून प्रत्यक्ष काम केले 
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी डी वाघ ग्रामविकास अधिकारी सुनगाव यांनी केले तर आभार प्रदर्शन शिंदे मंडळ अधिकारी यांनी केले 
कार्यक्रमासाठी जामोद मंडळातील ग्राम महसूल अधिकारी मुळे,  काळे विशाल शिंदे , मंडल अधिकारी जळगाव सुरेश राठोड ,सुरेश बोबडे सचिन कपले, तुकाराम ढोले  महसूल सेवक व ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments