Advertisement

मुलाने केली पित्याची हत्या, अक्षय तृतीयेला बुलढाणा जिल्हा हादरला



    मुलाने केली पित्याची हत्या, 
अक्षय तृतीयेला बुलढाणा जिल्हा हादरला!

     :  पित्याची सख्खा मुलाने निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लोणी गुरव या गावात हा प्रकार उघडकीस आला आहे.घटनेमुळे अक्षय तृतीयेला खामगाव तालुक्यासह बुलढाणा जिल्हा अक्षरशः हादरला आहे. 


   : खामगाव तालुक्यातील लोणी गुरव येथे आज बुधवारी, ३० एप्रिल रोजी सकाळी हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून गावकरी  व नातेवाईक हादरले आहे. घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार व कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांना खामगाव ग्रामीणचे ठाणेदार यांनी घटनेची प्राथमिक माहिती दिली. त्या पाठोपाठ उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसाह  लोणी गुरव गावात दाखल  झाले. आरोपी मुलास ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. घटनेची प्राथमिक माहिती अशी की गोरख हिवराळे ( वय पंचावण वर्षे, राहणार लोणी गुरव, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा ) असे निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून  बुधवारी सकाळी  राहत्या घरात अंथरुणावर मृता अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती पोलीस पाटील व अन्य नागरिकांनी खामगाव ग्रामीण पोलिसांना दिली. प्राथमिल चौकशीत मृतकाचे मुलगा मुलगा धनंजय गोरख हिवराळे ( वय अंदाजे २५ वर्षे) यानेच पित्याची निर्घृण हत्या केल्याचे निष्पन्न झाले मृतकला दारूचे व्यसन  होते. दारू पिऊन आपल्या पत्नीला दररोज मारहाण करायचा.दारुड्या बाप पत्नीला रोज मारतो याची चीड निर्माण झाली यामुळे मंगळवारी, २९ एप्रिल रोजी रात्री जाड लाकडी दांड्याने दारूच्या नशेत निपचित झोपलेल्या बापावर लाकडी दांड्याने दणादण वार केले.मारहाणीत पित्याचा मृत्यू झाला.घटनेने गाव हादरले असून गावावर शोक कळा पसरली असून गावात वरिष्ठ अधिकारी, विविध पथक दखल झाली आहे. यामुळे लोणी गुरव गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे...

अहिल्या न्यूज चॅनल करिता सौ सरला ताई राजेंद्र ससाणे  ची बातमी


Post a Comment

0 Comments