Advertisement

आमदार साहेबांचे स्वित सहाय्यक प्रकाश सदाशिव राऊत व इतरांवर एकट्रोसिटी अकट नुसर कारवाई करा? प्रहार जनशकती पक्ष ,ऑल इंडिया पँथर सेना यांच्या सऱ्युक निवेदनातून देण्यात आला,



आमदार साहेबांचे स्वित सहाय्यक प्रकाश सदाशिव राऊत व इतरांवर एकट्रोसिटी  अकट नुसर  कारवाई करा!!अन्यथा प्रहार जनशकती पक्ष ,ऑल  इंडिया पँथर सेना यांच्या सऱ्युक विद्यमाने उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर भव्य लोकशाही बचाव आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला,!!


दिनाक,15/4/2025 रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे व ऑल इंडिया पँथर सेना यांचे संयुक्त विद्यमाने तहसीलदार संग्रामपूर यांचे मार्फत उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव जामोद यांना निवेदन सादर केले 

निवेदनात  दिनांक ११एप्रिल २०२५ रोजी रात्री १२ वाजता जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार डॉक्टर संजय कुटे साहेब साहेब यांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन टेंभा आंदोलन करण्यात आले  यामध्ये (शेतकरी कर्जमाफी शेतमालाला हमीभाव) यासारख्या न्यायिक मागण्या करिता शांततेच्या मार्गाने प्रति प्रतीकात्मक आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाच्या पक्षश्रेष्ठीच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात आले आहे,

तसेच जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार डॉक्टर संजय श्रीराम कुटे यांच्या निवासास्थाना समोर आंदोलन करण्याकरिता आंदोलक गेलो असता सत्ताधारी आमदारांनी पाळलेले, स्वतःला शासकीय पी ए समजणारे श्री.प्रकाश सदाशिव राऊत  यांनी आंदोलकांना जातीय मानसिकतेतून मारहाण केली आंदोलक सर्व अनुसूचित जातीतील होते सर्व आंदोलकांच्या गळ्यामध्ये निळे दुपट्टे होते संविधानिक मार्गाने आंदोलन करीत शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य माणसांचे हक्क अधिकारासाठी लढणारे हे आंदोलन नेहमी शासनाच्या दरबारी आपल्या मागण्या मांडत असतात. असं असताना श्री. प्रकाश सदाशिव राऊत यांना निळे दुपट्टे, संविधानाच्या सन्मानात उतरलेले अनुसूचित जातीतील असल्याने  मारहाण करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, तुम्ही कुठल्या गावचे आहात रे, तुमच्या गावातयेवून तुम्हाला मारणार, तुम्हाला घोडे लावणार, साहेबांचा घरासमोर तुम्ही आंदोलन करता काय?  तुम्हाला एवढी मस्ती आली आहे का? की तुम्ही आमदारा साहेबांच्या घरासमोर टेंबे आंदोलन करणार? तुमची खाण्याची सोय आहे का? असे हिन वागणूक तैनात असलेल्या पोलीस बांधवांच्या समक्ष बोलून व मारहान करत होते.


पोलीस बग्याची भूमिका घेत उभी होती   हा सर्व प्रकार घटना स्थळी उपस्थित पत्रकार राजेंद्र ससाणे यांनी आपल्या कॅमेरात कैद करत असताना पत्रकार राजेंद्र ससाने हे देखील अनुसूचित जातीतील असल्याकारणाने त्यांचा मोबाईल देखील पोलीस प्रशासनाने ह्या गुंडाच्या सांगण्यावरून जप्त केला व  दुसऱ्या दिवशी मोबाईल मधील महत्त्वपूर्ण डाटा डिलीट करून त्यांना दमदाटी करून त्यातील घटनेचे  पुरावे नष्ट करून त्यांचा मोबाईल परत केला.वरील सर्व प्रकार संविधानिक हक्क अधिकारांचे उल्लंघन आहे आंदोलन करणे हा आमचा हक्क आहे.असे असताना  चुकीचे आरोप देखील करण्यात आले आहेत हे बेवडे आहेत, हे दारू पिऊन आले आहेत यांची खाण्याची सोय नाही असे त्यांनी  हक्क अधिकाऱ्यांचे हनन केलं. जातीय मानसिकतेतून  छळ करण्यात आला आहे. प्रकाश सदाशिव राऊत आणि त्यांच्या सोबतचे गुंड यांच्यावर सात  दिवसात एकत्रोसिती अक्त नुसार गुन्हा नोंदवून कारवाई करावी अन्यथा उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव जामोद समोर लोकशाही मार्गाने प्रहार जनशक्ती पक्षाचे व ऑल इंडिया पँथर सेना यांचे संयुक्त विद्यमाने भव्य लोकशाही बचाव आक्रोश मोर्चा बाच्चु भाऊ कडू,व पँथर दीपक भाई केदार यांचे उपस्थितीत दिनाक 23/4/2025 रोजी दुपारी 12 वाजता विशाल मोर्चा घेऊन धडकणार,असल्याचे दिलेल्या निवेदनातून नमूद केले निवेदनावर सौरभ प्रदीप बावसकर,पंकज गजानन शेगोकार,अतुल नारायण वानखडे,सय्यद इरफान सैय्यद इस्माईल,विजय रामदास वानखडे,व सुजित बंगर,हरिभाऊ नारायण तायडे यांचेसह बऱ्याच सह्या आहेत,निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री मंत्रालय मुंबई,पालकमंत्री बुलडाणा, जिल्हा अधिकारी बुलडाणा, जिल्हा पोलिस अधीक्षक बुलडाणा,उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव जा, तहसीलदार जळगाव जा व ठाणेदार  पो, स्टे,जळगाव जा,यांना देण्यात आल्या,

Post a Comment

0 Comments