Advertisement

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर अवमान प्रकरणी कठोर कारवाई करा

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर अवमान प्रकरणी कठोर कारवाई करा

संपूर्ण देशवाशीयांचे आराध्य दैवत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी अपमानजनक फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी सुनील उभे या विकृत व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा यासाठी काल बुलढाणा जिल्हा यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर यांना निवेदन देण्यात आले होते. 

संपूर्ण भारतीय नागरिकांची अस्मित आणि पूजनीय लोककल्याणकारी महाराणी पुण्यशोक अहिल्यादेवी होळकर यांचा विषयी अपमान जनक फेसबुक पोस्ट केल्या प्रकरणी सुनिल उभे या विकृत व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा. हा व्यक्ती महाराष्ट्र राज्याची नाही, तर संपूर्ण भारत देशातील शांतता भंग करून सामाजिक तेड निर्माण करीत आहे. अशा लोकांवर जर कारवाई झाली नाही. तर अशा निकृती समाजामध्ये दंगली घडविण्याचा उद्देशाने पुनः पुन्हा महापुरुषांचा अपमान करीत राहतील, या व्यक्तीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्‌दल अपशब्द पोस्ट कमेट केले आहे, या संदर्भात या मूर्ख माणसांवर  कायदेशीर कारवाई करावी तसेच या हरामखोराला आणि नीचप्रवृतीला संविधानिक कलाम नुसार गुन्हा दाखल करावा, अन्यथा यशवंत सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन यावेळी देण्यात आले आहे, यावेळी यशवंत सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आंदोलन सम्राट गजानन बोरकर, श्रीराम हुले, अनिल ढवळे, सुरेश काळे, रामचंद्र साखरे, शेषराव कातडे, विनोद भुसारी , संदीप टाले, शिवाजी औदगे
सुभाष खोडवे या सर्वांचे उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments