*जळगाव जामोद (ता. ३० जून):* शहरातील एकता नगर परिसरात मोकाट डुकरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून, या समस्येने त्रस्त झालेल्या महिला रहिवाशांनी नगर परिषदेला लेखी निवेदन सादर करून तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
महिलांनी दिलेल्या अर्जात नमूद केल्याप्रमाणे, सदर डुक्कर हे अंगणात व घरात घुसून लहान मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही पालिकेला तक्रार करूनही योग्य कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदन आरती कळमकार.दिपमाला पवार. दिपमाला गौतम दामोदर निशा डोंगरे. यांच्यासह इतर महिलांचा समावेश होता.
या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशाराही अर्जात देण्यात आला आहे.
0 Comments