*२५ वर्षीय तरुणाची पूर्णा नदीचे पुलावरून उडी मारून आत्महत्या...ओम साई फाउंडेशनला ३ ऱ्या दिवशी मृतदेह सापडला...*
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद तालुक्यातील निमकराड जवळील पूर्णा नदीपात्रामध्ये दिनांक १८ जुलै रोजी दुपारी २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह शोधण्यास ओम साई फाउंडेशन ला यश आले आहे.दिनांक १६ जुलै रोजी खामगांव तालुक्यातील वाडी येथील २५ वर्षिय तरूण मंगेश कळस्कार हा दुपारी २ वाजेपासून घरून कोणालाही न सांगता निघून गेला होता. नंतर संध्याकाळी माहिती मिळाली की मृतक मंगेश कळस्कार यांने मानेगाव येथील पूर्णा नदीचे लहान पुलावरून नदीपात्रात उडी मारली आहे. दोन दिवस नदीपात्रात ओम साई फाउंडेशन च्या टीमने अथक परिश्रम घेत मंगेशच्या मृतदेहाचा शोध घेतला.व दिनांक १८ जुलै रोजी मंगेश कळस्कार याचा मृतदेह निमकराड येथील पूर्णा नदी पात्रात शोध पथकाला मिळाला. घटनेची फिर्याद मृतक मंगेश चे काका सुनील जयराम कळस्कार वय ४५ वर्षे राहणार सुटाळा तालुका खामगाव यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली. त्यांच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनला मर्ग दाखल करण्यात आला. या शोध कार्यात ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष विलास निंबोळकर, सुभाष पिवळतकर, नितीन ठाकरे, आश्विन फेरण, कृष्णा वसोकार, विष्णू धांडे, राहुल निमकर्डे, कपिल पाटील, सतीश हिंगणगाव यांनी शोध कार्यात अथक परिश्रम घेतले. यावेळी जळगाव जामोद महसूल विभागाने ओम साई फाउंडेशन च्या रेस्क्यू पथकाला शोध कार्यामध्ये मदत तर केलीच नाही परंतु त्यांना साधे पिण्याचे पाणी सुद्धा उपलब्ध करून दिले नाही हे विशेष.या घटनेचा पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात जळगाव पोलीस करीत आहेत.
0 Comments