Advertisement

गुरु शिष्य परंपरेचा आदर्श विर एकलव्य: भारती अवचार.जागतिक आदिवासी दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न



गुरु शिष्य परंपरेचा आदर्श विर एकलव्य: 
भारती अवचार.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न.

बुलढाणा:
निषादराज हिरण्यधनु यांचे पुत्र  विर एकलव्य यांनी गुरुदक्षिणेत आपला अंगठा देऊन गुरु शिष्य परंपरेचे अद्वितीय उदाहरण निर्माण केले. त्याग, समर्पण आणि अन्यायाविरोधात पेटून उठणारे विर एकलव्य आदिवासींचेच नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. बुलढाणा शहराचे मूळ नाव भिल्लठाणा असल्यामुळे बुलढानेकरांच्या सदैव हृदयात विर एकलव्यांचा संघर्ष तेवत राहील. असे मत रमाई ब्रिगेडच्या मोताळा तालुका अध्यक्ष भारती अवचार यांनी व्यक्त केले.
स्थानिक आझाद हिंद शेतकरी संघटना, किसान ब्रिगेड, रमाई ब्रिगेड, आझाद हिंद महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमानातून 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त सकाळी बुलढाण्यातील जयस्तंभ चौक येथे विर एकलव्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिवादन पर मनोगत व्यक्त करताना अवचार यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.  वीर एकलव्य यांच्या पुतळ्याला पुष्पांजली समर्पित करून सामूहिक अभिवादनाणे कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. 
यावेळी सुरेखाताई निकाळजे, पंचफुलाबाई गवई,आशाताई गायकवाड, सिंधुताई अहिर,कासाबाई काळवाघे, सविता इंगळे, अनुसयाबाई पवार, अन्नपूर्णा चाफेकर, शोभा मोरे, ॲड सतीशचंद्र रोठे पाटील,उल्हास काकर,सागर व्यवहारे, ॲड.प्रतीक देखणे, विजय बावस्कर,संजय एन्डोले,योगेश कोकाटे, भूपेश पाटील, सुशांत पाटील, निलेश ढकचवळे,मनोज पाटील, राम व्यवहारे, पुरुषोत्तम व्यवहारे यांच्यासह आदिवासी बांधवांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी विर एकलव्य यांच्या जीवन चरित्रावर आणि आदिवासी समाज रचनेवर अभ्यासपूर्ण विचार व्यक्त करत अभिवादन केले. राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.
___
बुलढाणा
दिनांक 10/08/2025

Post a Comment

0 Comments