जळगाव ते बुऱ्हाणपूर मार्गावर असलेल्या सातपुडा पर्वतामधील भिंगारा घाटामध्ये दिनांक 9 ऑगस्ट चे रात्री आयषर ट्रक कोसळला त्यामध्ये दोन जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची माहिति आहेत. अपघात एवढा भीषण होता की आयशर वाहन अर्धा किलो मीटर खोलदरी मध्ये पडला.
बऱ्हाणपूर वरून जळगाव कडे येत असताना रात्री भरधाव वेगाने येणारा आयषर वाहन क्रमांक एम एच 27 एक्स 7875 या क्रमांकाचा आयशर ट्रक चालकाचे स्टेरिंग वरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे यामध्ये अमरावती येथील प्रभू दिलीप मोड आणि सावन मनोहर दहिकर राहणार गुमगाव नागपूर वय 17 या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
तर अमर हरिराम उईके वय 36 वर्ष राहणार शिरजगाव तालुका परतवाडा जिल्हा अमरावती, विजय सहदेवराव उईके राहणार परतवाडा जिल्हा अमरावती हे दोन जण जखमी झाले असून त्यांना जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात तात्पुरते उपचार घेऊन पुढील उपचारर्थ अमरावतीला रेफर करण्यात आले.आज सकाळपासून भिंगारा घाटातील मृतदेह काढण्याचे काम जळगाव जामोद पोलीस करीत आहेत. अक्षरशः स्ट्रेचर झाडाला दोर बांधून मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले. मोठ्या मेहनतीने दुपारपर्यंत मृतदेह काढण्यात यश मिळाले.असल्याची माहिती मिळाली आहे,
अहिल्या न्युज24 चॅनल करिता सौं सरला ताई राजेंद्र ससाणे ची बातमी
जळगाव जामोद, बुलडाणा
0 Comments