महसूल मंत्री बावनकुळेंना क्रांतीदिनी आझाद हिंदची सलामी.
शेत रस्ते पांदण रस्त्यासाठी ब्रिटिश कालीन नकाशांचा आधार घ्यावा:
आझाद हिंदच्या उपस्थितीमुळे काही वेळ तणावाची परिस्थिती.
बुलढाणा:
महाराष्ट्रात सर्वप्रथम बुलढाणा जिल्ह्यात सुरू झालेली महसूल आणि जुने रेकॉर्डची ई प्रणाली, गाव दत्तक योजना, व्हाट्सअप चाट बॉट पॅटर्न महाराष्ट्रात मातृतीर्थ बुलढाणा पॅटर्न म्हणून सुरू करणे. शेत रस्ते,पानंद रस्त्यांचे अनुषंगाने ब्रिटिश कालीन नकाशांचा आधार घ्यावा.यासह विविध शेतकरी आणि लोकहिताच्या मागण्यांसाठी
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेत 9 ऑगस्ट क्रांती दिनी आगळा वेगळ्या निवेदनातून सलामी दिली.
निवेदनामध्ये महाराष्ट्र सरकारच्या शेत रस्ते पानंद रस्त्याच्या निर्णयाचे स्वागत करीत एक ऑगस्ट च्या शासन अध्यादेशाप्रमाणे वतीने शेत रस्ते, पानंद रस्ते बारा फुटाचे करण्याचे अनुषंगाने ब्रिटिश कालीन नकाशांचा आधार घ्यावा. जेणेकरून चुकीच्या पद्धतीने नोंद झालेल्या सातबारा आठ अ ची समस्या निकाली लागेल. आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणारे शेत रस्ते,पानंद रस्ते कमी वेळात मिळतील. त्यासाठी तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांना या अनुषंगाने सर्वे करण्याचे आदेश पारित व्हावे. या सह बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी 35 महिन्यांमध्ये तेरा तालुके आणि 9680 चौरस किलोमीटरचा परिसराचा विकासात्मक दृष्टिकोन ठेवून सुरू केलेली ई प्रणाली, मंडळ अधिकाऱ्यांना दिलेले लॅपटॉप,
शेती पूरक व्यवसाय, फळबाग शेती, पडीत जमीन, सातबारा जिवंत मोहीम, पर्यटन,व्यवसाय आदी शेतकरी आणि नागरिकांच्या विकासात्मक योजना कार्यपद्धती महाराष्ट्र मध्ये सर्वप्रथम बुलढाणा जिल्ह्यात सुरू केल्या आहेत. सदर योजना मातृ तीर्थ बुलढाणा पॅटर्न म्हणून महाराष्ट्रात सर्वत्र लागू केल्यास शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी ही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनावर ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील, कमलाकर व्यवहारे, उल्हास काकर, सागर कुयटे, सुरेखाताई निकाळजे, अनुसया पवार, शितल कासारे, लक्ष्मी काकफळे, संगीता तायडे, भारती अवचार, सिंधुताई अहिर,पंचफुलाबाई गवई,आशाताई गायकवाड, कासाबाई काळवाघे, अन्नपूर्णा चाफेकर यांच्यासह आझाद हिंद शेतकरी संघटना, ग्राम स्वराज्य समिती, आझाद हिंद महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
__
संवेदनशील महसूल मंत्री बावनकुळे..
प्रत्यक्ष निवेदन कर्त्यांपर्यंत जाऊन घेतले निवेदन.
मंत्री महोदयांचे दौरे नेहमी चर्चेचा विषय ठरतात.परंतु महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 9 ऑगस्ट ला बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन झाले. यावेळी सकाळपासून भेटण्यासाठी आलेल्या संघटना प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांना प्रथम भेट दिली.प्रशासकीय मीटिंग आणि सोपस्कार बाजूला सारून प्रथम शेतकरी शेतमजूर आणि संघटनांचे निवेदन स्वीकारण्याला प्राधान्य दिले. तर स्वतः निवेदनकर्त्यांपर्यंत जाऊन त्यांचे निवेदन स्वीकारले. यावरून संवेदनशीलता आणि शेतकरी आणि सामाजिक चळवळींच्या पदाधिकाऱ्यांविषयी असलेला कृतज्ञता भाव त्यांच्या कृतीतून अनुभवाला आला. त्यामुळे काही वेळ सुरक्षा व्यवस्थेची यंत्रणाही बिघडली.
_
आझाद हिंदने दिला जिल्हा प्रशासनाला आश्चर्याचा धक्का :
महसूल मंत्री बावनकुळे यांच्या बुलढाणा जिल्हा दौऱ्याच्या निमित्ताने आझाद हिंदचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात एकसंघ झाल्याने पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले. पण यावेळी आझाद हिंद ने आंदोलनात्मक पवित्रा न घेता जिल्हा प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे जिल्हा प्रशासनालाही आश्चर्याचा धक्का बसला.
शासन प्रशासनाच्या विरोधात लढा उभारणाऱ्या आझाद हिंद ने कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चांगल्या कार्यपद्धतीची दखल घेत त्या अनुषंगाने शासन प्रशासनाला थेट निवेदनही दिले. तर महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यातील सर्वप्रथम सुरू झालेल्या चांगल्या योजनांना मातृतीर्थ बुलढाणा पॅटर्न म्हणून महाराष्ट्रात लागू करण्याची आगळीवेगळी मागणी आझाद हिंद ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदनातून केली. ज्यामुळे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
__
बुलढाणा :
दिनांक : 09/08/2025
0 Comments