Advertisement

सरपंच सौ प्रियांका राहुल मेटांगे व ग्रामपंचायत पळशी झाशी त्यांच्या पुढाकारात गावात दारूबंदी व शेतकरी कर्जमाफी यासाठी निघाली भव्य मोटर सायकल रॅली.

सरपंच सौ प्रियांका राहुल मेटांगे व ग्रामपंचायत पळशी झाशी त्यांच्या पुढाकारात गावात दारूबंदी व शेतकरी कर्जमाफी यासाठी निघाली भव्य मोटर सायकल रॅली. 
       दिनांक 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण संपल्यानंतर गावामध्ये ग्रामसभा घेण्यात आली असता शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत गावात सुरू असलेली अवैध दारूबंदी व्हावी तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी सर्वांनी मते ठराव मंजूर करण्यात आला, त्यानंतर गावात स्वतंत्र दिनानिमित्त शासनाच्या हरघर तिरंगा उपक्रमांतर्गत मोटर सायकल रॅलीचे आयोजन केले होते. 


त्याचवेळी गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गावातून रॅली झाल्यावर गावात दारूबंदी व शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यासाठी संग्रामपूर तहसील तसेच पोलीस स्टेशनला निवेदन देण्याचे ठरले व ठरल्यानुसार शेकडो टू व्हीलर, फोर व्हीलर, तसेच स्कूल बस घेऊन माजी सैनिक शेकडो युवक, महिलावर्ग, व गावकरी मंडळी यांनी पोलीस स्टेशन मध्ये माननीय बोपटे साहेब तसेच तहसील कार्यालयामध्ये माननीय तहसीलदार प्रशांत पाटील साहेब यांना  गावकऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले. 
        गावात ग्रामसभा ही माजी सैनिक माननीय,मनोहर भाऊ दोरेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी मंचकावर सरपंच सौ.प्रियांका मेटांगे, उपसरपंच पंचफुलाबाई पवार, माजी सैनिक गजानन भाऊ वाघ, रामभाऊ येनकर, आनंद भाऊ तायडे, अनिरुद्ध येनकर, तसेच गावातील पोलीस पाटील संतोष भाऊ निकाळजे, शंकर गिरी महाराज मंदिरचे कार्याध्यक्ष गुलाबराव मारोडे, शिवसेना उपतालुका प्रमुख विजुभाऊ मारोडे, माजी उपसरपंच राजूभाऊ मारोडे, सौ लताताई आखरे, निकिता गिरी, मुक्ताताई चितोडे, अशोक भाऊ भिवटे, गजानन भाऊ पाचपोर, बाळूभाऊ नायसे, हरिदास भाऊ बांगर, अरुण भाऊ गिरी, अनंता भाऊ आमले, अमोल दामले, उमेश भाऊ कोठे, सुरेश भाऊ हेलगे व इतर सदस्य उपस्थित होते, त्यावेळी सुजित बांगर, राहुल मेटांगे, माजी सरपंच अभयसिंह मारोडे, गुलाबराव मारोडे, सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे, उपसरपंच पंचफुलाबाई पवार यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल भाऊ दोरकर तर आभार प्रदर्शन पोलीस पाटील संतोष भाऊ निकाळजे यांनी केले.
     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर बचत गटांच्या सर्व महिला व युवकांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.

( गावात अवैध दारू विक्री असल्यामुळे बाहेर गावावरून सुद्धा बरेचसे मद्यपी गावात येऊन गावाचे चांगले असलेले वातावरण बिघडवत असतात, तसेच शाळा ग्रामपंचायत आणि सामाजिक ठिकाणी नेहमी नेहमी या माध्यमांचा खूप त्रास होत आहे ही दारू प्रशासनाने लवकरात लवकर आळा घालून शंभर टक्के बंद करावी, नाहीतर आम्ही पुन्हा शेकडो गावकऱ्यांसह मोठ्या प्रमाणात आंदोलन करू व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील. तसेच हे सर्व गोष्टी गावकऱ्यांमुळे घडत आहेत त्यामुळे गावकऱ्यांचे मनःपूर्वक आभार)
     सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे.

Post a Comment

0 Comments