जिल्हा परिषद शाळा पळशी झाशी येथे पोलीस उपनिरीक्षक माननीय
ग्रामपंचायत पळशी झाशी सरपंच सौ प्रियांका राहुल मेटांगे संकल्पनेतून पोलीस स्टेशन तामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली गावात मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले मोबाईल मध्ये विद्यार्थ्यांचा वाढलेला कल, तसेच चांगला अभ्यास करून चांगलं नाव स्वतःचं आई-वडिलांचं आणि गावाचं नाव रोशन करण्यासंदर्भात संपूर्ण मार्गदर्शन माननीय श्री पोलीस उपनिरीक्षक रामकिसनजी माळी यांनी केले, गावात शंकरगिरी महाराजांच्या आशीर्वादाने बरेचसे विद्यार्थी नोकरी करत आहेत तसेच आपणही चांगला अभ्यास करून चांगलं नाव कमवा असं यावेळी त्यांनी सांगितलं.
त्याच वेळी ग्रामपंचायत तसेच शाळेमध्ये विद्यार्थी व गावकऱ्यांना काही अडचण असल्यास पोलीस पाटील माननीय श्री संतोष भाऊ निकाळजे यांच्या पाटीचे अनावरण माननीय श्री रामकिशनजी माळी यांच्या हस्ते करण्यात आले. गावात शाळेत कुणाला काहीही अडचण त्रास असल्यास पोलीस पाटील, सरपंच यांना त्वरित माहिती कळवा असे सांगण्यात आले.
त्याचवेळी पोलीस पाटील संतोष भाऊ निकाळजे, सरपंच पती राहुल मेटांगे, सुजित बांगर, यांनी मार्गदर्शन केले, त्यावेळी सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे, उपसरपंच पंचफुलाबाई पवार, ग्रामपंचायत सदस्य अमोल दामले, शाळा समिती अध्यक्ष निकिता ताई गिरी, उपाध्यक्ष मुक्ताताई चितोडे, किरण ताई शिरसोले, अर्चना ताई निकाळजे, शोभा ताई वानखडे ताई, होमगार्ड शेख सलीम शेख सत्तार, ग्रामपंचायत कर्मचारी सुधाकर भाऊ शिरसोले, ज्ञानेश्वर भाऊ मारोडे, मुख्याध्यापक सोळंके सर, वावगे सर, तांबडे सर, निमजे मॅडम, डाबेराव मॅडम, देशमुख मॅडम, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
0 Comments