Advertisement

परिवारापासून लांब भावांना अश्रू अनावर:जिल्हा सामान्य रुग्णालयात आझाद हिंदचे रक्षाबंधन:

press Note:

परिवारापासून लांब भावांना अश्रू अनावर:

जिल्हा सामान्य रुग्णालयात आझाद हिंदचे रक्षाबंधन: 

रक्षाबंधन ऋणानुबंधाचे: सातत्य 31 वर्षांचे.


बुलढाणा: 
शारीरिक व्याधींमुळे त्रस्त रुग्णांना बहिणीची माया आणि परिवाराचा सहवास दुर्मिळच लाभतो. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या असंख्य भावांना बहिणीच्या हातून रक्षाबंधन आणि औक्षणाला परिस्थितीमुळे मुकावे लागते. त्यामुळेच आझाद हिंद महिला संघटनेच्या वतीने सलग 31 व्या वर्षी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शहरातील अनाथ भावांना नऊ ऑगस्टला दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनाचे ऋणानुबंध जपण्याचा अभिनव सातत्य आणि जिव्हाळ्याने सुरू ठेवला आहे.

रक्षाबंधनाच्या पर्वावर नऊ ऑगस्टला बुलढाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण पुरुषांच्या सर्व वार्डांमध्ये जाऊन आझाद हिंद च्या बहिणींनी रुग्ण भावांना विधिवत औक्षण ओवाळत रक्षाबंधन केले.यावेळी असंख्य भावांना अश्रू अनावर झाले.
रक्षाबंधनाचे ऋणानुबंध उपक्रमामध्ये आझाद हिंद महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखाताई निकाळजे, पंचफुलाबाई गवई,आशाताई गायकवाड, सिंधुताई अहिर, भारती अवचार, संगीता तायडे, लक्ष्मी काकफळे, शितल कासारे, अनुसया पवार, सविता इंगळे, कासाबाई काळवाघे, अन्नपूर्णाबाई चाफेकर, ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील, कमलाकर व्यवहारे, उल्हास काकर, सागर कुयटे यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील नर्स आणि कार्यालयीन कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
__&&&____
रक्षाबंधनाचे ऋणानुबंध: सलग 31 वे वर्ष.

कोणतीही ना जात यांची ना कोणताही धर्म यांचा. एक भारतीय म्हणून मानवतेच्या उदांत भावनेतून आझाद हिंद महिला संघटनेच्या वतीने सलग 31 व्या वर्षी रक्षाबंधनाचे ऋणानुबंध उपक्रम सुरू ठेवला. परिवार आणि बहिणी पासून लांब असलेल्या गरजवंत भावांपर्यंत आझाद हिंद च्या बहिणी जाऊन औक्षण ओवाळून रक्षाबंधन करता तेव्हा आजही माणुसकी मानवता जिवंत असल्याचा प्रत्यय येतो.
____

बुलढाणा:
 दिनांक: 9 ऑगस्ट 2025

Post a Comment

0 Comments