बुलडाणा.
घरकुल मंजूर जागेवर बळजबरीचा कब्जा; दत्तपूर येथील भारत जाधव यांची जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण,!!
दत्तपूर येथील भारत रामचंद्र जाधव या नागरिकाला शासनाकडून घरकुल योजना मंजूर होऊन पहिला हप्ता मिळालेला असतानाही, संबंधित बांधकाम सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला गैरअर्जदार राजेंद्र शामराव वानेरे यांनी कथितरित्या बळजबरीने तीच जागा ताब्यात घेऊन बांधकाम सुरू केल्याचा आरोप केला आहे.
जिल्हाधिकारी, बुलडाणा यांच्याकडे सादर केलेल्यानिवेदनत, राहत्या जागेवर शासनाकडून मंजूर घरकुलासाठी बांधकाम सुरू करण्याकरिता जुने घर मोडले. मात्र, गैरअर्जदार यांनी अचानक येऊन ती जागा त्यांची असल्याचा दावा करत तिथेच स्वतःचे घर बांधण्यास सुरुवात केली आहे. यामुळे घरकुलाचे बांधकाम ठप्प झाले असून, शासनाचा हप्ता मिळालेला असूनही उपोषण करता घरविहीन झालो आहे ग्रामसेवक व तलाठी यांनी तात्काळ चौकशी करून, सरपंच व संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, गैरअर्जदाराचे बांधकाम थांबवावे योग्य जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. प्रकरणात गैरअर्जदारास मदत करणाऱ्यांवरही कार्यवाही करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.अन्यथा"जर माझ्या घरकुलाच्या बांधकामाबाबत त्वरित तोडगा निघाला नाही, तर मला लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसावे लागेल.असा इशारा दिला परंतु कोणतीही कारवाई न केल्याने स्वातंत्र्य दिनापूर्वी अखेर आमरण उपोषण सुरु केले
प्रकरणाची चौकशी करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे,
अहिल्या न्युज 24 करिता सौं सरला ताई ससाणे
बुलढाणा
0 Comments