सुनगाव येथील संत्रा फळगळ व सोयाबीन वर येलो मोजॅकचा प्रादुर्भाव
जळगाव जामोद तालुक्यातील सोनगाव जामोद परिसरात संत्रा उत्पादक शेतकरी फार मोठ्यात आहेत व संत्रा पिकाचा पेरा फार मोठ्या प्रमाणात आहे परंतु यावर्षी आलेल्या रोगामुळे व पावसामुळे सोयाबीन वर पिवळा मोज्याक व यावर्षीच्या संत्रा मृग बारामधील संत्र्याच्या झाडावरील फुले व फळे यांचे वर अज्ञात रोग आल्याने संत्र्याची फुले व फळे गळून पडली आहेत तसेच यंदाच्या पावसाने सुद्धा संत्र्याची फुले व फळे गळून पडली आहेत त्यामुळे नुकसान झालेले आहे
याबाबत तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद यांना सुनगाव येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी निवेदन दिलेले आहे संत्रा फळगळ ही फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे परंतु संत्रा झाडांची व फळगळ प्रत्यक्ष पाहणी झालेली नाही त्यामुळे शेतकरी हवालदिन झालेला आहे तरी शेतकऱ्यांच्या संत्रा फळगळ झाडांची प्रत्यक्ष पाहणी करून यंदाच्या मृग बाराची योग्य ती भरपाई देण्यात यावी व त्याचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडून योग्य प्रकारे मदत मिळवून द्यावे अन्यथा योग्य त्या प्रकारे आंदोलन करण्याचा इशारा तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद यांना सूनगाव येथील संत्रा बागातदार शेतकऱ्यांनी दिले आहे
0 Comments