*राज्यातील धनगर जमात गेल्या 75 वर्षापासून संविधानिक हक्कापासून वंचित आहे. या अन्याया विरोधात जालना येथे आमरण उपोषण.*
महाराष्ट्र राज्यातील धनगर ही भटकी जमात गेल्या 75 वर्षापासून संविधानिक हक्क लागू करण्यात यावे. यासाठी लढा देत आहे. तरी या जातीला मूळ दर्जा पासून वंचित ठेवले जात आहे. याकरिता जालना येथे धनगर समाजाचे मा. दीपक बोराडे हे धनगर समाजाच्या संविधानिक मागण्या पूर्ण व्हावे. यासाठी दिनांक 17 सप्टेंबर 2025 पासून आमरण उपोषणास बसले आहेत. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने धनगर बांधव तसेच, इतर बांधवही जालना येथे भेटी देत आहे. येणाऱ्या धनगर बांधवांना टोल नाका वसुली ठिकाणी वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता सह मुख्य प्रवक्ता आयटी व मीडिया प्रमुख बिरू कोळेकर. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य. यांनी मा. प्रताप सरनाईक साहेब.राज्य परिवहन मंत्री. यांना टोल माफी बद्दलचे पत्रक सुद्धा दिले आहे.
जळगाव जिल्हा धनगर समाजाकडून आरक्षण विषयी चर्चा करण्यासाठी जळगाव जिल्हा धनगर समाज नेते. गजानन निळे सर. रवी भाऊ शिरोळे. यावल तालुका अध्यक्ष यांची सुद्धा उपस्थिती होती.
*गजानन बी.कवळे*
*जिल्हा प्रतिनिधी जळगाव खां.*
0 Comments