जळगाव जामोद प्रतिनिधी....
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे कार्यरत असलेले हितेंद्र जोशी यांनी सुनगाव येथील जनतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे
मागील वीस ते पंचवीस दिवसापासून सुनगाव येथे पाऊस असल्यामुळे तसेच गावातील नाल्या साफसफाई नसल्यामुळे नाल्या व डबक्यांमध्ये डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झालेली असुन त्यामुळे सूनगाव येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे यासाठी धुर फवारणी व इतर काही उपाययोजना करण्यासंदर्भात सुनगांव ग्रामपंचायतीला आरोग्य विभागाकडून ८ सप्टेंबर रोजी पत्र आले होते व त्यात आरोग्या संदर्भात ग्रामपंचायतला काही बाबींच्या उपयोजना करण्याचे सांगितले होते परंतु ग्रामसेवक जोशी यांनी या पत्राकडे साफ दुर्लक्ष करून पत्राला सरळ केराची टोपली दाखविली आहे व त्यावर जनजागृती किंवा कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत अशा बातम्या प्रसार माध्यमात प्रसिद्ध प्रदर्शित झाल्या होत्या त्यामुळे आरोग्य विभागाने १२ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत सुनगावला धूर फवारणीसाठी औषधी उपलब्ध करून दिले असून आज पाच ते सहा दिवस झाले तरीही ग्रामविकास अधिकारी हितेंद्र जोशी यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामपंचायतीने अजुनही गावात मच्छरांसाठी धूर फवारणी केली नाही.अशा या गावाप्रती बेजबाबदार असलेल्या हितेंद्र जोशी या ग्रामविकास अधिकाऱ्याने सुनगाव येथील नागरिकांच्या आरोग्याकडे साफ दुर्लक्ष केलेले असुन तरी त्यांच्यावर बदलीची कारवाई करण्यात यावी अशी तक्रार दिनांक १८ सप्टेंबर रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांच्याकडे सुनगाव येथील नागरिकांनी दाखल केलेली आहे या तक्रारीवर निलेश बानाईत, अमोल येडाखे, प्रशांत येऊल, मंगेश मानकर, प्रवीण झंवर, विजय बावस्कर, सुनील राऊत यांचेसह इतर ग्रामस्थांच्या सह्या आहेत
0 Comments