आज दी. 29/09/2025 रोजी तहसिलदार साहेब, तहसिल कार्यालय संग्रामपूर यांना सकल धनगर समाज संग्रामपूर तालुका. जि. बुलढाणा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले असून त्यामधे आमचे समाज बांधव दिपकभाऊ बोर्हाडे धनगर समाजाच्या ST आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी दी. 17/09/2025 पासून नियोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, अंबड चौफुली जालना येथे उपोषणास बसलेले आहेत. आज 13 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत. आज त्यांच्या उपोषणाला 13 दिवस झालेले असून. आज पर्यत महाराष्ट्र सरकारने उपोषणाची/आंदोलनाची कोणत्याच प्रकारची दखल घेतली नसुन आज रोजी उपोषण कर्ताची तब्बेत खालावत चाललेली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व सरकारमध्ये असलेले सर्व मंत्री यांनी लवकरात लवकर धनगर जमातीच्या घटनेनुसार ST आरक्षणाची अंमलबजावणी करून धनगर समाजाला न्याय द्यावा. कारण 2014 मध्ये बारामती येथे धनगर समाजाचे आमरण उपोषण सुरू असतांना त्यावेळेसचे विरोधी पक्ष नेते व आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महाराष्ट्रातील लोखोच्या संख्येने असलेला धनगर समाज जनसमुदायासमोर शब्द दिला होता की माझा धनगर ST आरक्षण बाबतीत फार अभ्यास झाला असून याबाबत माझ्याकडे धनगर STआरक्षण बाजूने पुरावे आहेत. आता पर्यतच्या राज्यकर्तांनी धनगरांचा फक्त मतापुरताच वापर केलेला आहे. तुम्ही आम्हाला या राज्याच्या सत्तेवर बसवा आमची सत्ता आल्यास पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आम्ही तुम्हाला आरक्षण देतो /आरक्षणाची अंमलबजावणी करतो. व हेच आश्वासन आताचे पंतप्रधानांनी सुध्दा धनगर समाजाला 2014 मध्ये दिलेले आहे. तरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व यांच्या मंत्रिमंडळाने धनगर आरक्षणाची अंमलबजावणी संदर्भातील या
सर्व गोष्टींचा अभ्यास करुन धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करूण दिपकभाऊ बोर्हाडे यांचे उपोषण सोडवावे अन्यथा आम्ही राज्यभरात तीव्र आंदोलन छेडणार आहोत. यात काही नुकसान झाल्यास व दिपकभाऊ यांच्या जीवितास काही बरे वाइट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र सरकारची असेल. याची सरकारने नोंद घ्यावी. आणी हे निवेदन देण्यासाठी धनगर समाज नेते भरतभाऊ वाघ, धनगर समाज नेत्या चंदाताई पुंडे, धनगर समाज महासंघाचे तालुका अध्यक्ष नंदकिशोर पुंडे, धनगर समाज मल्हारसेनेचे तालुका अध्यक्ष योगेश बाजोड, धनगर ऐक्य परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे सदस्य अशोक भिवटे, पेसोडा गावचे सरपंच नायबराव बोरसे, प्रकाशभाऊ उभे, संतोषभाऊ बाजोड, प्रकाशभाऊ साबे, अंबादास गव्हाळे, मोहनभाऊ बोरसे, तेजरावभाऊ वसतकार, संजय वाघ, संतोष चिकटे, राजेश परमाळे, संजय बोरसे, योगेश पुंडे, सागर बोदळे, दिलीप बोरसे, शांताराम पुंडे, भास्कर इलामे, शुभम इलामे, श्रीकृष्ण वसतकार, संतोष लोनाग्रे, लक्ष्मण वसतकार,विजय भिवटे, विष्णु लोणाग्रे, रामदास घनोवट,मनिष इलामे, प्रफुल्ल घुले, कैलास पुंडे, रामेश्वर वसतकार, सुरज पुंडे, संदिप पुंडे, सतिष बोरसे,मोहन पुंडे, ज्ञानेश्वर बाजोड, काशिराम इलामे, वैभव बाजोड, संजय भाऊराव बोरसे, रामेश्वर बोरसे, संजय पुंडे, अमोल पुंडे, रमेश बोरसे, तेजराव बोरसे, अशोक काळींगे, विजय बोरसे, ब्रम्हदेव गावंडे, विलास बोरसे, शंकर बोरसे, दिनकर खाळपे, सुरेश बोरसे, अनंता वाघ, अनंता एकनाथ वाघ, प्रफुल्ल बोरसे, मार्तंड बोरसे, लक्ष्मण वसतकार, मार्तंड वसतकार,आकाश बोरसे, अशोक साबे (भेडवळ),सुनिल भिवटे (आसलगांव) व संग्रामपूर तालुक्यातील असे बरेच धनगर समाज बांधव उपस्थित होते.
0 Comments