Advertisement

देवरी फाटा येथे सकल धनगर समाजाचे वतीने रास्ता रोको आंदोलन

देवरी फाटा येथे सकल धनगर समाजाचे वतीने रास्ता रोको आंदोलन 

अकोट तालुक्यातील देवरी फाटा येथे सकल धनगर समाजाचे वतीने धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तसेच मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू करण्यात येऊ नये यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

गेल्या अनेक दिवसापासून जालना येथे धनगर समाजाचे युवा नेते दीपक बोराडे हे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या संविधानिक मागणी करीता आमरण उपोषणास बसले आहेत परंतु अद्याप पर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेऊन निर्णय घेतला नाही महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा दुसऱ्या क्रमांकावर असून अडीच ते तीन कोटी लोकसंख्या ही धनगर समाजाची आहे. व घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला घटनेच्या कलम 340,341,342 अन्वये काही सोयी सवलती दिल्या आहेत त्यामुळे अनुसूचित जाती,जमाती आदेश कायदा 1950 व 1976 या कायदा क्रमांक (108) परिशिष्ट (1) मधील भाग (9) मध्ये नमूद केल्याप्रमाणे अनुक्रमांक 36 वर ओरान, धनगड या जातीचा महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे परंतु एक ही व्यक्ती धनगड आज पर्यंत आढळून आली नाही ते धनगरच आहेत भारतात वास्तविकपणे अर्वाचीन काळापासून जातीय व्यवस्था कार्यरत असून तो पिढ्यानपिढ्या पूर्वापार चालत आलेली आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले धनगर समाजाचे नेते काशीराम भाऊ साबळे विनोद भाऊ नांदुरकर गजानन मालठाणे सुनील भाऊ अगडते अशोक पातोड सुनील दीवनालेअनिल सुलताने पांडुरंग दामोदर सुभाष दामोदर प्रकाश भाऊ चिकटे सुनील नांदुरकर प्रकाश गुरव हरिभाऊ देऊन आले रामदास होऊ देऊन आले मोहन दामोदर गजानन भाऊ दामोदर निळकंठ बचे रामदासजी होपवळ तुकाराम जी लाखे जितेंद्र नागे प्रदीप डामरे असे गजानन  शिवदास भाऊ चोपडे सर्व आजूबाजूच्या ग्रामीणमधले असंग धनगर समाज बांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments