Advertisement

खामगाव नांदुरा रोड वरती पारखेड फाट्यावरती गुटख्याची कंटेनर जप्तनागेश भटकर उपसंपादक

खामगाव नांदुरा रोड वरती पारखेड  फाट्यावरती गुटख्याची कंटेनर जप्त
नागेश भटकर उपसंपादक
बुलढाणाः जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक ठेवत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कामगिरी बजावली आहे. खामगाव-नांदुरा रोडवरील पारखेड फाट्यावर एका कंटेनरमधून

 गुटख्याचा अवैध साठा पकडण्यात आला असून, तब्बल ५० लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड बुलढाणा यांच्या मार्गदर्शनात तसेच स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली ३ सप्टेंबर रोजी पार पडली. गुप्त माहितीनुसार गुजरात राज्यातून खामगावकडे गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर खामगाव ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत सापळा रचण्यात आला. पारखेड फाट्यावर थांबवण्यात आलेल्या कंटेनरची कसून झडती घेतली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याचा साठा किंमत २५.३५ लाख सापडला. त्याचबरोबर कंटेनरसह एकूण जप्त मालमत्ता ५०.३५ लाख रुपयांपर्यंत पोहोचली. या प्रकरणात रामराज दुल्हारे वय ४८रा. फतेपूर उत्तर प्रदेश या चालकाला अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भादंवी कलम २७४, २७५, ३२८, तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे कलम २६ आणि ५९अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोउपनि. अविनाश जायभाये, पोहेकॉ. दीपक लेकुरवाळे, शेख चांद, गणेश पाटील, पोकॉ. गजानन गोरले, व चापोकॉ. निवृत्ती पुंड यांनी महत्त्वपूर्ण सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments