Advertisement

गुणगौरव गुणवंतांचा तेली समाज पंच मंडळ आयोजित कार्यक्रमात सूनगाव येथील खुशी सोनटक्के व श्रुती आकोटकार हिचा सत्कार

गुणगौरव गुणवंतांचा  तेली समाज पंच मंडळ आयोजित कार्यक्रमात सूनगाव येथील खुशी सोनटक्के व श्रुती आकोटकार हिचा सत्कार

जळगाव जामोद तालुका तेली समाज पंच मंडळ आयोजित गुणवंतांचा गौरव कार्यक्रम जळगाव जामोद येथील दुर्गा चौक येथील संताजी संकुल येथे

 काल दि. पाच सप्टेंबर रोजी कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश आकोटकार सर महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा  व विजय अडचुले सेवानिवृत्त बांधकाम अभियंता खामगाव भागवत सर डॉ विलास खवणे गणेश जामोदे संजय पांडव तालुकाध्यक्ष भाजपा यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमांमध्ये तेली समाजातील तालुक्यातील सर्व समाज बांधव सहभागी झाले होते या कार्यक्रमात तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार आयोजित केला होता त्यामध्ये त्यामध्ये सुनगाव येथील खुशी रामदास सोनटक्के व श्रुती सुरेश आकोटकर दि न्यू इरा हायस्कूलच्या विद्यार्थीनि व सिद्धिविनायक इन्स्टिट्यूट जळगाव जामोद येथील इंग्लिश स्पिकिंग मध्ये अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविल्याबद्दल केल्याबद्दल त्यांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला व पाचवी ते बारावीपर्यंत परीक्षेमध्ये अ श्रेणी गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला व काही स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व इतरही सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला

Post a Comment

0 Comments