Advertisement

नांदुरा तालुक्यातील 78 बेघर लाभार्थींना मिळणार हक्काची जागा

नांदुरा तालुक्यातील 78 बेघर लाभार्थींना मिळणार हक्काची जागा 
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत नांदुरा येथे दिनांक 27/10/2025 रोजी शक्ती प्रदक्त समिती नांदुरा ची सभा मा. श्री शिंदे साहेब उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी सभेला मा. श्री. जंगम तहसीलदार नांदुरा मा. श्री. भरत हिवाळे गट विकास अधिकारी पंचायत समिती नांदुरा उपस्थित होते. सभेमध्ये खालील गावाचे 78 प्रस्ताव मंजूर झाले. 
1) निमगाव_31
2) वसाडी खू_1 
3) लोणवाडी_ 3
4) वडनेर भोलजी _3 
5) अवद्या बु_22
6) अवधा खु _ 15 
7) नारायणपूर_01
8) दिघी (सानपुडी)_01
9) सावरगाव चाहू_01 
 असे एकूण 78 बेघर लाभार्थींना  प्रति लाभार्थी 500 चौ. फूट शासकीय जागा घरकुल बांधकामासाठी मंजूर करून दे ण्यात आली. त्यामुळे नांदुरा तालुक्यातील 78 बेघर लाभार्थींना हक्काचे घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. 
संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांनी नमुना न. न. ८ ला त्वरित नोंद  घेऊन प्रस्ताव सादर करण्याचे कळविले आहे. 
सदर प्रस्ताव मंजुरीसाठी मा. श्री. शिंदे साहेब उपविभागीय अधिकारी राजस्व मलकापूर, मा. श्री. जंगम साहेब तहसीलदार नांदुरा मा. श्री. भरत हिवाळे साहेब गट विकास अधिकारी पंचायत समिती नांदुरा, मा. श्री. एस. टी. चव्हाण सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती नांदुरा, यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने श्री. पी .एस .जामोदे विस्तार अधिकारी पंचायत व श्री. पी .पी. खोद्रे विस्तार अधिकारी पंचायत यांनी वरिष्ठांचे विशेष आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments