देव धाबा ता. मलकापूर जि. बुलढाणा येथील तरुण अल्पभूधारक शेतकरी गोपाळ भगवान गोराडे. शासनाच्या विविध धोरण उदा. शेतीमालाला योग्य भाव न मिळणे, नैसर्गिक आपत्ती, ना हरकत कर्मचारी, अधिकारी. यांचा यांचा होणारा त्रासाला कंटाळून घरातील म्हाताऱ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा, व दोन जुळे मुले, व पत्नी. अशा परिवाराचा करता पुरुष त्यांचे कडे अधिकृत बँकेचे स्वतः नावाचे कर्ज 80 हजार व वडीलाचे नावे अधिकृत बँकेचे 80 हजार रुपये असा एकूण अंदाजे एक लाख साठ हजार रुपये अधिक व्याज या सर्व विषयाला कंटाळून भाजप सरकारचा मतदाता याने रात्री घरातील सर्व व्यक्ती झोपलेले असताना राहत्या घरातच छताला दोरी बांधून फाशी घेऊन दिनांक ०३-१०-२०२५ रात्री जीवनमान संपविले आहे. घरातील व्यक्तीला रात्री जाग आल्यानंतर मृतदेह दोरीला लटकलेला दिसला.
यामुळे गावात अत्यंत दुःखद शांतता पसरली आहे.
तिकडे महाशय 19 हजार रुपयांचे किचनमधले जेवण घेऊन 21 लाखाच्या सोफ्यावर निवांत झोपण्याचे स्वप्न रंगवित आहे.
आता तरी सरकार जागेवर येईल की, आणखी काही रोजच्या राज्यात शेतकरी आत्महत्या होण्याची वाट पाहत आहेत. अशी अपेक्षा जनतेच्या मनात व्यक्त होत आहे.
आता तरी नेते मंडळी फलकावरून उतरून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून सरकारला जागेवर आणतील.अशी अपेक्षा जनतेकडून दिसून येत आहे.
*गजानन बी. कवळे*
*जील्हा प्रतिनिधी जळगाव* *(खां.)*
0 Comments