बुलढाणा नगराध्यक्षसाठी उर्मिलाताई रोठे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई आहे.
उर्मिलाताई रोठे.
बुलढाणा :
बुलढानेकरांना नागरी सुविधा देण्याबरोबर स्वच्छ आणि सुंदर बुलढाणा देण्यासाठी आझाद हिंद ने मागील 30 वर्ष अविरत लढा दिला आहे. रस्ते नाल्या यासह अनधिकृत व्यवसाय बंद करण्यासाठी आझाद हिंद देणे केलेला संघर्ष बुलढाने करांना सर्वश्रुत आहे.
तोच लगा गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडी, आझाद हिंद शेतकरी संघटना, रमाई ब्रिगेड ,ग्रामस्वराज्य समिती यांच्या संयुक्त आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून सौ उर्मिला सतीशचंद्र रोठे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला आहे.बुलढाणा नगरपरिषद नगराध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक 11 ब चे नगरसेवक म्हणून 17 नोव्हेंबरला शेवटच्या दिवशी आझाद हिंद ने निवडणूक रणसंग्रामात लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
सुज्ञ मतदार वादविवाद मुक्त शहर, शांततामय बुलढाणा, स्वच्छ सुंदर बुलढाणा प्रस्थापित करण्यासाठी, आझाद हिंदच्या निस्वार्थ सेवा कार्याला बळ देतील या प्रांजळ भावनेने आझाद हिंदने तीस वर्षानंतर प्रथमच नगरपरिषद निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
सक्षम पर्याय म्हणून आपणांसमोर ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील यांच्या धर्मपत्नी उर्मिलाताई रोठे यांनी आज मायबाप जनतेची प्रामाणिक सेवेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या या लढाईमध्ये मायबाप जनतेचा आशीर्वाद निस्वार्थ समाजसेवक कार्यकर्त्याला मिळेल ही अपेक्षा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उर्मिलाताई रोठे यांनी यावेळी व्यक्त केली.
____
बुलढाणा:
दिनांक: 18/11/2025
0 Comments